अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘गौप्यस्फोट’, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार तापसी पन्नू लवकरच सांड की आंख या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रींना अभिनेत्याला दिल्या जाणाऱ्या एकूण मानधनाच्या 5 ते 10 टक्केच मानधन दिलं जातं असं वक्तव्य तापसी पन्नूनं केलं आहे. सांड की आंख या सिनेमाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात मुंबईत ती बोलत होती. तापसी म्हणाली, “मी लोकांना अपील करते त्यांनी महिला प्रधान सिनेमांनाही बरोबरीची संधी द्यायला हवी आणि बदल घडवायला हवा.”

तापसी म्हणाली, “आम्हाला अभिनेत्यांच्या मानधनाच्या तुलनेत 5 ते 10 टक्केच मानधन मिळतं. याचे कारण म्हणजे तुम्ही महिला प्रधान सिनेमापेक्षा पुरुषप्रधान सिनेमा जास्त पाहता. जेव्हा तुम्ही महिला प्रधान सिनेमे पाहाल तेव्हा समानता येईल. तु्म्ही सगळे मला हे प्राप्त करण्यासाठी मदत कराल.”

सांड की आंख हा सिनेमा 25 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. शुटर दादी या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या प्रकाशी आणि चंद्रो तोमर यांच्या जीवनावर आधारीत सिनेमाची कथा आहे. या दोघीही एकमेकींच्या जावा आहेत.

Visit : policenama.com

 

Loading...
You might also like