Dr. Sachchidanand Mungantiwar Passes Away | सुधीर मुनगंटीवार यांना पितृशोक, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे निधन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Dr. Sachchidanand Mungantiwar Passes Away | भाजप नेते (BJP Leader) आणि राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचे वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचं निधन झालं आहे. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) माजी विभाग संघचालक होते. तसेच ते चंद्रपूरातील प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांचे आज संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास निधन (Dr. Sachchidanand Mungantiwar Passes Away) झालं. नागपूर येथील किंग्जवे या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मुनगंटीवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटरवर सच्चिदानंद मुनगंटीवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

माझे सहकारी सुधीर मुनगंटीवार यांचे वडील, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. सुधीरभाऊ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांनी रा. स्व.संघ, लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) स्मारक मंडळ, चिन्मय मिशन (Chinmay Mission) अशा अनेक माध्यमातून सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील. एक भक्कम आधारस्तंभ म्हणून ते आम्हा सर्वांच्या पाठिशी उभे असत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे 91 वर्षांचे होते. त्यांचे हृदय विकाराने निधन (Dr. Sachchidanand Mungantiwar Passes Away) झाले. रा. स्व. संघाचे विभाग संघचालक, लोकमान्‍य टिळक स्‍मारक मंडळाचे अध्‍यक्ष, चिन्‍मय मिशनचे अध्‍यक्ष, डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समितीचे अध्‍यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या.
1967 मध्ये भाजप कडून चंद्रपूर विधानसभेची (Chandrapur Assembly) निवडणूक लढवली होती.
विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव तर चंद्रपूरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत.
त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी सुचिता चकनलवार, स्नुषा, जावई, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थीवावर शांतीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Web Title :- Dr.Sachchidanand Mungantiwar Passes Away | bjp leader sudhir mungantiwar father sachchidanand mungantiwar passed away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | जूनमध्ये वाढेल DA, महाराष्ट्र सरकारने केले कन्फर्म, पगारात होईल 40,000 रूपयांची वाढ

 

Ramdas Athavale | ‘…तर संभाजीराजे भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले असते’ – रामदास आठवले

 

EPFO Interest Rate | नोकरदारांना मोठा धक्का ! EPFO च्या व्याजदरात मोठी कपात