भाजपची उमेदवारी मागताना ३० लाखांचा चेक झळकविणारे सचिन चौगुले शिवसेनेत

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

भाजपकडून उमेदवारी मागताना भर मुलाखतीत ३० लाख रुपयांचा चेक झळकविणारे सचिन चौगुले यांचा तो व्हिडिओ चांगला व्हायरल झाला होता. अशा या सचिन चौगुले यांनी भाजपतून आता शिवसेनेत उडी घेतली आहे.

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. त्यात पैसे असणारा उमेदवार हीच विजयाची क्षमता अशी भाजपाची मानसिकता असेल तर माझ्याकडे ३० लाख रुपये आहेत, असे खळबळजनक विधान करत मुलाखती चालू असतानाच चौगुले यांनी चेक झळकवला होता. यामुळे व्यासपीठावर बसलेले भाजप आमदार आणि नेत्यांची भंबेरी उडाली होती. चौगुलेच्या उमेदवारीसाठीच्या या विधानामुळे भाजपच्या उमेदवारी प्रक्रियेवर त्यावेळी प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात होते.

[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4817f29e-84c6-11e8-a054-074cc0ba29b8′]

भाजप नेत्यांची त्यांनी गोची करुन ठेवली होती. तिकीट दिले तरी पंचाईत आणि नाही दिले तरी पंचाईत अशी त्यांची अवस्था झाली होती. भाजप नेत्यांची ही समस्या स्वत: सचिन चौगुले यांनीच सोडविली. ती त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन. शिवसेना पक्षाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय विभूते, शेखर माने अशा सांगलीतील नेत्यांचीही उपस्थिती होते.

मिरजेत भाजपकडून काही दिवसांपूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. मुलाखती दरम्यान भाजपचा सक्रिय कार्यकर्ता असलेल्या सचिन चौगुलेने मुलाखत घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना थेट ३० लाखांचा चेक दाखवत उमेदवारीची मागणी केली होती.