सचिन-विनोद पुन्हा एकत्र, आचरेकर सरांचे घेतले आशीर्वाद

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – धावांचा पाऊस पाडणारी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार असून सचिनला त्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात साथ देण्याचा निर्णय विनोद कांबळीने घेतला आहे. सचिनने इंग्लिश मिडलसेक्स काउंटी क्लबसोबत नवी क्रिकेट प्रबोधिनी स्थापन केली आहे. तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अ‍ॅकेडमी या नावाने ही प्रबोधिनी ओळखली जाईल. या प्रबोधिनीद्वारे सचिन जगभरात युवा क्रिकेटपटू घडवणार आहे. १ नोव्हेंबरपासून याचा शुभारंभ होतो आहे. यानिमित्त दोघांनी रमाकांत आचरेकर सरांकडे जाऊन आशीर्वाद घेतले. या अ‍ॅकेडमीचा कॅम्प १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान पुणे येथेही होणार आहे.

सणासुदीच्या दिवसात गॅसचा भडका 

सचिनने ही माहिती स्वत: सोशल मीडियावरून दिली. काही फोटो सचिन तेंडुलकरने ट्विटर आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर केले आहेत. सचिन आणि विनादे कांबळी ही जोडी नवे खेळाडु घडविण्यासाठी पुन्हा एकदा मैदानावर उतरत आहे. याच अनुषंगाने त्यांनी क्रिकेटमधले द्रोणाचार्य समजल्या जाणाऱ्या रमाकांत आचरेकर यांचे आशीर्वाद घेतले. सचिन आणि विनोद कांबळी या दोघांची जोडी जशी चर्चेत होती तशीच आचेरकर सरांची म्हणजेच या दोघांच्या गुरुंचीही तेवढीच चर्चा त्यावेळी होती. या आठवणी दस्तुरखुद्द सचिनने ताज्या केल्या आहेत. या संदर्भातली पोस्ट फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट केली आहे तसेच फोटोही शेअर केले आहेत.
सचिन आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आजची दुपार माझ्यासाठी विशेष आहे कारण ज्या व्यक्तीने आम्हाला शिकवलं, आम्हाला तयार केलं.

पुण्यात भल्या सकाळी दूध व्यावसायिकाचा कोयत्याने सपासप वार करून खुन

आपण कोण आहोत याची जाणीव ज्या व्यक्तीने करून दिली त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. या पोस्टसोबत सचिनने फेसबुक आणि ट्विटरवर फोटोही शेअर केले आहेत. सचिनची ही अ‍ॅकेडमी राज्याच्या वेगवेगळया भागांमध्ये कॅम्प आयोजित करुन प्रशिक्षण देण्याबरोबरच युवा प्रतिभावान क्रिकेटपटूंचा शोध घेणार आहे. १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान नेरुळच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये त्यानंतर ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान वांद्रे एमआयजी क्लब येथे कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. ७ ते १७ आणि १३ ते १८ वयोगटातील क्रिकेटपटू या कॅम्पमध्ये सहभागी होऊ शकतील. १२ ते १५ नोव्हेंबर आणि १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान पुणे येथे कॅम्प होणार आहे.

क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर.सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघेही टीम इंडियासाठी उत्तम खेळ केलेले खेळाडू आहेत. एक काळ असा होता की या दोघांची जोडी हिट ठरली होती. मात्र अनेक वादांमुळे विनोद कांबळीला क्रिकेटचे मैदान सोडावे लागले होते.