VIDEO : सचिनने अनोखा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना विचारले, ‘आऊट की नॉट आऊट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट हा खेळ बऱ्याच वर्षांपासून खेळला जात असला तरी या खेळात अशा काही परिस्थिती निर्माण होतात की, अंपायरना निर्णय देणे मुश्किल होऊन जाते. महान खेळाडू सचिन तेंडुलकरने अशाच परिस्थितीतील एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून सचिनने यावर चाहत्यांना मत व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे. जर तुम्ही अंपायर असला असता तर या खेळाडूला बाद ठरवले असते की, नाबाद असा प्रश्न सचिनने विचारला आहे.

सचिनने पोस्ट केलेल्या ३१ सेकंदाच्या व्हिडिओत एका वेगवान गोलंदाजाच्या गोलंदाजीवर चेंडू स्टंपवरील बेल्सला थोडासा स्पर्श करतो, या स्पर्शामुळे बेल्स मात्र खाली न पडता स्टम्पवरच राहतात. यावर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने अंपायरकडे अपील केले. अंपायरने बेल्स जागेवर ठेवले आणि मुख्य अंपायरशी सल्लामसलत करून खेळाडूला नाबाद ठरवले. क्षेत्ररक्षण करणारा संघ अंपायरच्या या निर्णयावर नाराज झालेला दिसला.

हा व्हिडीओ शेअर करून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने लिहिले की, माझ्या एका मित्राने मला हा व्हिडीओ शेअर केला आहे. हे असामान्य आहे. सचिनने या व्हिडिओवर चाहत्यांचे मत मागितले आहे. या सामन्यात तुम्ही अंपायर असता तर काय निर्णय दिला असता असा प्रश्न सचिनने चाहत्यांना विचारला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –