Sachin Vaze Case : सचिन वाझे नव्हे तर मोठी व्यक्ती कटाची खरी सूत्रधार, NIA करणार ‘पर्दाफाश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी निवासस्थानाबाहेर स्फोटक प्रकरणी मुंबई पोलिसांचे क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली असून हेच या काटातील सूत्रधार मानण्यात येत होते. या याप्रकरणी एनआयए ने मुंबई पोलिसांची इनोव्हा कार, एका व्यक्तीची मर्सिडीज कार, कारमधील डायरी, बॅग आणि पाच लाख रुपये त्याच बरोबर वाझेंच्या कार्यालयातील संगणक काही कागदपत्रे जप्त केली आहेत. तपासा दरम्यान आणखी एक माहिती समोर आली असून या कटातील मुख्यसूत्रधार वाझे नसल्याचे दिसत आहे. दुसराच कोणीतरी या मागे असून त्याच्या आदेशावरूनच वाझे काम करत असल्याचा दावा एनआयएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. लवकरच या सूत्रधाराची पोलखोल करण्यात येणार आहे. दरम्यान, एनआयएला या कटातील खऱ्या सूत्रधाराची माहिती मिळाली. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्याची पटकथा लिहिली गेल्याचे मानले जात आहे.

प्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि जुने नाव पुन्हा मिळविण्यासाठी कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या सांगण्य़ावरून हा कट रचल्याचे सचिन वाझे यांनी एनआयएला सांगितले. असे असतानाच परमबीर सिंहांची बदली झाल्याने तेच होते की आणखी कोण आहे य़ाबाबत चर्चा सुरु झाली आहे. एनआयएला वाझेंनी त्या व्यक्तीचे नाव सांगितले नाही. तूर्त तरी संशय कायम असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले. वाझेंच्या माहितीच्या आधारे परमबीर सिह यांच्याकडे संशयाची सुई जात आहे. त्यामुळे त्यांनाही आयुक्त पदावरून हटविल्यानंतर चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याचे एनआयने सांगितले.

आणखी दोन गाड्यांचा शोध
या प्रकरणात आतापर्यंत इनोव्हा आणि मर्सिडीज कार जप्त केली असून एनआयए आणखी दोन गाड्यांचा शोध घेत आहे. यामध्ये आणखी एक मर्सिडीज कार आणि स्कोडा कार आहे. दरम्यान जप्त केलेली मर्सिडीज हि धुळ्यातील एका व्यक्तीची असल्याचे समोर आले. मात्र संधीत व्यक्तीने हि कार ऑनलाईन सेंकंड हँड कार डीलर कंपनी कार २४ ला विकल्याचा दावा केला आहे. परंतु तपासासाठी असल्याचे त्याने सांगितले आहे. दुसरीकडे गुन्हे शाखेतील सचिन वाझेंचा जवळचा सहकारी म्हणून रियाझ काझीला ओळखले जाते. वाझेंच्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज रियाझनेच नेले होते. चौथ्या दिवशीही त्याच्याकडेच एनआयए चौकशी करत होते.