अँटीलिया केसमध्ये आणखी एक नवे वळण ! अखेर बनावट आयडीसह फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये का थांबले होते सचिन वाझे?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटीलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याच्या प्रकरणात एनआयए तपास करत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सोमवारी राष्ट्रीय तपास एजन्सीने त्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चौकशी केली जिथे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे काही दिवसांसाठी थांबले होते. एनआयएच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, एका टीमने नरीमन पॉईंटच्या ट्रायडेंट हॉटेलच्या एका खोलीची झडती घेतली, जिथे वाझे 16 फेब्रुवारीपासून 20 फेब्रुवारीपर्यंत थांबले होते. वाझे यांनी एक बनावट आधार कार्डसह हॉटेलची रूम बुक केली होती, ज्यामध्ये बनावट नावाने त्यांचे छायचित्र होते.

हॉटेलमध्ये राहात असताना मुंबई क्राइम ब्रँचमध्ये होते वाझे
एका वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले की, हॉटेलकडून कागदपत्र आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकार्‍याने सांगितले की, वाझे या हॉटेलमध्ये बनावट आयडीने ज्या तारखेला थांबले होते ती तारीख त्या काळाशी मिळती-जुळती आहे जेव्हा वाझे एका अशा टीमचा भाग होते, ज्या टीमने लायसन्सच्या अटींच्या उल्लंघनासंदर्भात रात्री मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. वाझे यांनी त्या तारखेदरम्यान मुंबई क्राइम ब्रँचच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटमध्ये सुद्धा काम केले. एनआयएच्या टीमने हॉटेलच्या रूममधून काही कागदपत्र जप्त केली आहेत, परंतु हे स्पष्ट नाही की, त्यामध्ये काय आहे. टीमने हॉटेलमधून सीसीटीव्ही फुटेजसुद्धा जप्त केले आहे. 13 मार्चला अटक करण्यात आलेले वाझे यांना ठाण्यातील 48 वर्षीय व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येत सुद्धा मुख्य आरोपी बनवले आहे.

हिरेन यांच्या पत्नीचा घेतला जबाब
एनआयएच्या टीमने हिरेन यांची पत्नी विमला यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब घेतला होता. हिरेन यांचे भाऊ विनोद यांनी म्हटले, एनआयएने घरी येऊन आम्हाला त्यांच्या तपासाची स्थिती सांगितली आणि म्हटले की, ते एटीएसकडून सर्व माहिती घेणार आहेत. आतापर्यंत माझ्या भावाच्या हत्येप्रकरणी अधिकृतपणे गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांनी आम्हाला सांगितले की, प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी पुढील दिवस आम्हाला ते भेटायला येतील. ते थोड्या वेळासाठी थांबले आणि गेले. दरम्यान, एटीएसने रविवारी हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एक माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि एक सट्टेबाज नरेश गोर यांना अटक केली होती.