Sadabhau Khot | सदाभाऊ खोतांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘राष्ट्रवादीकडून माझ्या जीवाला धोका, विशेषत: पवार कुटुंबाकडून…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sadabhau Khot | भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवर (NCP) जोरदार आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर पवार कुटुंबाकडून मला धोका असल्याचा दावा देखील सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सदाभाऊ खोत यांच्यावर 2014 पासून हॉटेल बिल थकवल्याचा आरोप करत सोलापूरमध्ये हॉटेल मालक अशोक शिंगारे (Ashok Shingare) यांनी त्यांचा ताफा अडवला. यानंतर खोत यांनी आरोप केले आहेत.

 

“मी या प्रकरणाची गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करतो. राष्ट्रवादी पक्षाकडून माझ्या जीवाला धोका आहे. विशेषत: पवार कुटुंबाकडून मला धोका आहे. माझा जीव गेला तरी चालेल पण मी राष्ट्रवादी विरोधात लढत राहणार आहे. हा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष आहे. त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल.” असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी म्हटलं आहे.

 

पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, “2014 च्या निवडणुकीत माझा प्रचार करणारे कार्यकर्ते, पक्षाचे लोक घरातील भाकरी बांधून प्रचार करत होते. माझा एकही कार्यकर्ता त्या काळात हॉटेलमध्ये चहाही घेत नव्हता. कारण आमच्याकडे पैसेही नव्हते. 2014 नंतर मी 20 – 25 वेळा सांगोल्याचा दौरा केला. ही व्यक्ती कधीही मला येऊन भेटली नाही आणि काही सांगितलं नाही. कोण जेवलं, कुणी पाठवलं, त्याबाबत काही माहिती आहे का तेही मला आढळून आलं नसल्याचं,” ते म्हणाले.

त्याचबरोबर “हा सर्व प्रकार झाला तेव्हा सर्व मीडिया तेथे सुसज्ज होता. त्यामुळे मी याचा शोध घेतला तर अशोक शिंगारे हा मोठा गुन्हेगार आहे असं कळालं. २०२० मध्ये कर्नाटकमधून सोने चोरीचा गुन्हा या व्यक्तीविरोधात दाखल आहे. या व्यक्तिविरोधात सात गुन्हे दाखल आहेत. तो वाळू माफिया आहे, तो दारू विक्रेता आहे. यानंतर आम्ही याचा सूत्रधार कोण आहे याचाही शोध घेतला. त्या व्यक्तीच्या फोनवर कुणाचे फोन आले, त्याला अटक केल्यावर पोलिसांना कुणी फोन केले त्याचे रेकॉर्ड काढणं अत्यंत गरजेचं असल्याचं,” सदाभाऊ खोत म्हणाले.

 

“यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता आहे.
त्या नेत्यानेच या व्यक्तीला तू फक्त असं बोलत राहा आणि आम्ही त्याचं शुटिंग करून पसरवतो म्हणून सांगितलं.
पण, टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या या टोमॅटोला सांगतो की असं षडयंत्र रचून सदाभाऊचा आवाज दाबता येणार नाही.
याचा शोध मला लागला, पण पोलिसांना का लागला नाही ?,” असं ते म्हणाले.

 

दरम्यान, “राष्ट्रवादीकडून सातत्याने मला धमकावण्याचा, माझ्यावर हल्ला करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे.
याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे, विरोधी पक्षनेते यांच्याकडे मागणी करणार आहे.
राष्ट्रवादी गुन्हेगारांना सांगून मला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते होणार नाही.
रयत क्रांती संघटना याचा मुकाबला करेल,” असंही खोत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Sadabhau Khot | sadabhau khot allege threat to life from ncp pawar family in solapur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा