Sahakar Maharshi Shankarrao Kolhe Passes Away | माजी मंत्री सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचे निधन

कोपरगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Sahakar Maharshi Shankarrao Kolhe Passes Away | सरपंच ते राज्याचे माजी मंत्री असा राजकीय प्रवास केलेले आणि साईबाबा शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष शंकरराव गेनुजी कोल्हे (Shankarrao Kolhe) यांचे बुधवारी पहाटे साडेचार वाजता नाशिक येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षाचे होते. त्यांच्यावर आज सायंकाळी साडेचार वाजता कोपरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार, महसूल, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, कमाल जमीन धारणा या खात्याचे मंत्री म्हणून शंकरराव कोल्हे यांनी काम केले होते. (Sahakar Maharshi Shankarrao Kolhe Passes Away)

 

कोल्हे यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे २४ मार्च १९२९ रोजी झाला होता. त्यांनी येसगावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करीत थेट राज्याचे मंत्रीपदापर्यंत मजल मारली होती. राजकीय, शैक्षणिक, सहकार, उद्योग, शेती या क्षेत्रात त्यांनी अनेक पदावर यशस्वीरित्या काम केले. ते कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून १९७२ मध्ये अपक्ष म्हणून सर्वप्रथम आमदार झाले होते. शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे ते ९ वर्षे उपाध्यक्ष होते. कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे ते अध्यक्षही होते. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे ते संस्थापक, अध्यक्ष होते.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Sahakar Maharshi Shankarrao Kolhe Passes Away

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा