Sahakar Nagar Pune Crime | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sahakar Nagar Pune Crime | पुण्यातील बालाजीनगर (Balaji Nagar Dhankawadi) परिसरात बंद घराचे कुलुप तोडून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Criminal On Police Records) सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police) अटक केली आहे. घरफोडीच्या घटना रविवारी (दि.21) दुपारी साडेतीन आणि 23 मार्च रोजी दुपारी साडे तीन ते 26 मार्च रात्री अकराच्या दरम्यान घडली होती. रोहन शांताराम बंडागळे (वय-39 रा. कोपरी कॉलनी, परासी वाडी, ठाणे पुर्व) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीने बालाजीनगर येथील सबुली बिल्डिंगमधील फ्लॅट नं. 2 मध्ये घरफोडी करुन 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी अजित महादेव शिंदे (वय-29 यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या घराचे कुलुप बनावट चावीने उघडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर अजित शिंदे यांनी सहकारनगर पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे करीत आहेत.

चोरीची दुसरी घटना बालाजीनगर परिसरातील राज प्लाझा बिल्डींग येथे घडली. याप्रकरणी अमोल चंद्रकांत गोसावी (वय-28) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांच्या घराला कुलूप लावून त्यांच्या मुळगावी सोगाव (ता. करमाळा) येथे गेले होते. चोरट्याने त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरातील कपाटातून 27 हजार 500 रुपयांची रोकड चोरुन नेली. फिर्यादी गावावरुन परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार बी.जे. खुटवड करीत आहेत.

मेट्रो स्टेशनवर चोरट्यांकडून कर्मचाऱ्याला मारहाण

पुणे : पीएमआरडीए च्या मेट्रो प्रकल्पाचे आणि स्टेशनेचे काम गणेशखिंड येथे सुरु आहे.
याठिकाणी चोरट्यांकडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी मेट्रोच्या कर्मचाऱ्याने चोरट्यांना हटकले.
तेव्हा आरोपींनी शिवीगाळ करत हाताने तसेच लोखंडी रॉडने मारहाण करुन स्टीलच्या वस्तू चोरुन नेल्या.
ही घटना शनिवारी (दि.20) रात्री पावणे आठच्या सुमारास घडली आहे.
याबाबत कुणाल भारत रणसिंग (वय २२, रा. गाडीतळ, पोलीस चौकीमागे, मंगळवार पेठ) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Anant Geete On Pawar Family | शरद पवारांचं घर कोणी फोडलं? शिवसेना नेते अनंत गीतेंनी केला गौप्यस्फोट, ‘या’ बड्या नेत्याचं नाव घेतल्याने खळबळ!

Mahavir Jayanti | महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त बिबेवाडी गंगाधाम येथे भव्य शोभायात्रा; मिरवणुकीत आमदार माधुरी मिसाळ आणि लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ सहभागी