शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी बंडखोर गटाचे अनाप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीत सत्ताधारी गुरुमाऊली मंडळात फूट पडली. चेअरमनपदी बंडखोर गटाचे साहेबराव अनाप व व्हाईस चेअरमन कधी बाळासाहेब मुखेकर हे विजयी झाले.

मंडळाचे नेते रावसाहेब रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे सर्व संचालक निवडून आले असताना पदाधिकारी निवडीवेळी काही संचालकांनी बंड केले. या बंडाचे नेतृत्व बापू तांबे, आबासाहेब जगताप व रावसाहेब सुंबे यांनी केले. बँकेच्या अध्यक्षपदी बंडखोर गटाचे साहेबराव अनाप (राहुरी) यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब मुखेकर (अकोले) यांची निवड झाली. बंडखोर गटाच्या ताब्यात ११, तर रोहोकले समर्थकांकडे ९ संचालक होते.

साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या बँकेच्या निवडणुकीत रावसाहेब रोहोकले यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळाचे सर्व संचालक निवडून आले होते. रोहोकले यांच्या एकहाती कारभारातून अनेक संकलक नाराज झाले होते. रावसाहेब रोहोकले हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिला. संचालक
म्हणूनही ते नियमानुसार निवृत्त झाले. त्यानंतर व्हाईस चेअरमनने काही काळ कारभार पाहिला.
त्यांनीही पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करण्यासाठी संचालक
मंडळाची आज सभा बोलविण्यात आली होती. यात अनाप यांनी बाजी मारली.

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी