#Video : बहुप्रतिक्षित ‘साहो’चा टीजर आऊट ; पहा प्रभास आणि श्रद्धा कपूरची जबरदस्त ‘अ‍ॅक्शन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर सिनेमा साहो चा ट्रेलर रिलीज झाला आहे. टीजरमधूनच एक झलक मिळते आहे की, या सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे यात मात्र शंका नाही. टीजरच्या सुरुवातीलाच श्रद्धा आणि प्रभास दिसतात. पूर्ण टीजरमध्ये प्रभासची शानदार अ‍ॅक्शन जॅकी श्रॉफ आणि नील नितीन मुकेशनेही बाजी मारली आहे.

या सिनेमाचे शानदार पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांना या सिनेमाच्या टीजरची आतुरतेने प्रतिक्षा होती. हा सिनेमा पोस्टर रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. परंतु आणखीन कारण आहे, ज्यामुळे सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. ते म्हणजे म्युझिक कंपोजर शंकर, अहसान , लॉय यांनी कोणतंही कारण न सांगता या सिनेमातून हात काढून घेतला होता.

त्यांनी या निर्णयाची घोषणा सोशल मीडियावरून केली. त्यांनी लिहिले आहे की, “आम्ही तुम्हा सर्वांना हे सांगू इच्छितो की, शंकर, अहसान आणि लॉय आता साहोसाठी म्युझिक कंपोज करणार नाहीत. आमच्याकडून प्रभास, सुजीत सिंह, वामसी, प्रमोद आणि श्याम यांना खूप साऱ्या शुभेच्छा.”

Saaho Official Teaser : Telugu | Prabhas | Shraddha Kapoor | Sujeeth | UV Creations | #SaahoTeaser

Darlings, #SaahoTeaser is out now. Hope you all enjoy it. Experience it in theatres from tomorrow! #TeluguTeaser‬‪SAAHO in theatres from 15th August!‬#SaahoTeaser Shraddha Kapoor Neil Nitin Mukesh Sujeeth UV Creations T-Series #15AugWithSaaho

Geplaatst door Prabhas op Woensdag 12 juni 2019

हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये शूट केला गेला आहे. साहोमध्ये प्रभास आणि श्रद्धा यांच्याशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, चंकी पांडे, अरूण विजय आणि मुरली शर्मा एंटरटेनमेंटचा तडका मारताना दिसणार आहे.

कधी रिलीज होणार साहो ?

गुलशन कुमार यांच्या टी सीरीज आणि भूषण कुमार आणि युवी क्रिएशन प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या साहोचे सुजीत दिग्दर्शन करत आहेत. वामसी, प्रमोद आणि विक्रम या सिनेमाची निर्मिती करत आहेत. 15 ऑगस्ट 2019 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. बाहुबली सिनेमानंतर प्रभासचा हा दुसरा सिनेमा आहे. ज्याची पूर्ण देशभर प्रतिक्षा केली जात आहे. कारण या सिनेमात प्रभासचा एक वेगळाच अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. याशिवाय प्रभास पहिल्यांदाच श्रद्धा कपूर सोबत दिसणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन

Loading...
You might also like