साई दरबारी आज भक्तांना आमरसाची मेजवानी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिर्डी साई संस्थानच्या प्रसादालयात भाविकांना आमरसाची मेजवानी देण्यात येत आहे. शिरूर येथील भाविक दीपक नारायण करगळ यांच्या देणगीतून भाविक आमरसाचा स्वाद घेणार आहेत. त्यामुळे आज शिर्डीत येणाऱ्या भाविकांना साईभक्त प्रसादालयात प्रसादाचा आस्वाद मिळणार आहे.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली. आमरस भोजनासाठी करगळ यांनी 7 हजार 748 किलो केशर आंबा साईबाबा चरणी अर्पण केला आहे. त्यामुळे आज संस्थान भोजनालयात किमान चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविक आमरसाचा स्वाद घेतील.

आज सुट्टीचा दिवस असल्याने शिर्डी येणाऱ्या साईभक्तांची संख्या मोठी असेल. गर्दीच्या दिवशीच आमरसाचा बेत ठेवण्यात आला आहे.