‘तैमूरची घरावर ‘दहशत’, करीनानं बिघडवलं’ : सैफ अली खान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सैफ अली खाननं नुकतंच एका मुलाखतीत बोलताना तैमूरबद्दल वक्तव्य केलं आहे. घरातील सर्वजण तैमूरचा खूप लाड करतात. करीना तैमूरला जास्त पॅम्परींग करते. नुकतंच सैफनं तैमूरच्या ॲग्रेसिव बिहेवियरबद्दल भाष्य केलं आहे. मला तैमूरबद्दल थोडं स्ट्रीक्ट व्हायचं आहे. करीना त्याला बिघडवत आहे. यामुळे तो घरात सर्वांना दम भरत आहे असं सैफ म्हणाला आहे.

तूमरच्या बिहेवियरबद्दल प्रश्न विचारल्यानंतर सैफ हसत हसत म्हणाला, “मला असं वाटतं की थोडं स्ट्रीक्ट होणं चांगलं आहे. तैमूर माझं तिसरं मूल आहे आणि करीनाचं पहिलं. त्यामुळे ती त्याला थोडं बिघडवत आहे. मला माहितीये हे कुठे चाललंय. आता तैमूर घरात सर्वांना दम भरायला लागला आहे. मला शाळेत जायचं नाही वगैरे असे प्रकार होताना दिसत आहेत.”

पुढे बोलताना सैफ म्हणाला, “तैमूर खूपच क्युट आहे. जर त्याला एखाद्या गोष्टीसाठी नकार दिला तर तो म्हणतो मला तू आवडत नाही. मी तुला मारेन. मी तुझं डोकं फोडेन असं तो म्हणतो”

सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तान्हाजी नंतर आता तो जवानी जानेमन सिनेमात दिसणार आहे. 31 जानेवारी रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात अलाया फर्निचरवाला आणि तब्बू प्रमुख भूमितकेत आहेत.