Tandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला सु्प्रीम कोर्टानं फटकारलं ! अटकेवर स्थगिती देण्यास दिला नकार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अ‍ॅक्ट्रेस डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची तांडव (Tandav) या अ‍ॅमेझॉन प्राईमवरील वेब सीरिजमुळं नवा वाद सुरू झाला आहे. भगवान शंकराचा अपमान करत हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप या सीरिजवर होत आहे. सध्या ही सीरिज बॅन करण्याची मागणी सुरू आहे. सीरिजचे मेकर्स आणि कलाकारांविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. वादानंतर मेकर्सनी माफीही मागितली आहे. तरीही यावरील वाद सुरूच आहे. आता एकूण 6 शहरांमध्ये सीरिज विरोधात FIR दाखल झाल्यानंतर युपीचे लखनऊ पोलीस मेकर्सची चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. इतकंच नाही तर विविध राज्यात दाखल झालेल्या तक्रारी रद्द करण्यासाठी डायरेक्टर अली अब्बास जफर यांनी याचिकाही दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात आज (बुधवार दि 27 जानेवारी) यावर सुनावणी झाली.

अली अब्बास जफर यांच्या व्यतिरीक्त प्रोड्युसर हिमांशु किशन मेहरा, लेखक गौरव सोलंकी, अ‍ॅमेझॉन प्राईम इंडियाच्या हेड अपर्णा पुरोहित आणि अ‍ॅक्टर मोहम्मद जीशान अयु्ब यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि कर्नाटक अशा राज्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर विरोधात तीन वेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत.

काय म्हणालं सुप्रीम कोर्ट ?

न्यायमुर्ती अशोक भूषण, न्यायमुर्ती आर सुभाष रेड्डी आणि न्यायमुर्ती एम आर शाह यांच्या खंडपीठानं एफआयआरविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावली केली. सुनावणी दरम्यान कोर्ट म्हणालं की, ज्या राज्यात एफआयआर दाखल झाली आहे त्या राज्यात आधी तपास होऊ द्या. अडचण काय आहे ?

सीनियर वकिल मुकूल रोहतगी म्हणाले, याचिकाकर्ते मुंबईचे रहिवाशी आहेत. ते वेगवेगळ्या राज्यात खटला कसा लढतील. अशात कोर्टानं सर्व एफआयआर क्लब करून मुंबईत स्थानांतरीत कराव्यात. वकिलांनी एम एफ हुसैन सहित इतर प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांचा हवाला दिला आहे. मुकूल यांनी अ‍ॅमेझॉन प्राईमच्या वतीनं सांगितलं की, आम्ही काही चुकीचं केलेलं नाही. आम्ही अशी इच्छा आहे की, सर्व 7 एफआयआर, ज्या 6 राज्यात दाखल झाल्या आहेत त्या एकत्र क्लब केल्या जाव्यात आणि एका राज्यात सुनावणीसाठी पाठवल्या जाव्यात.

अशी स्क्रीप्ट किंवा अ‍ॅक्टींग नसावी ज्यामुळं भावना दुखावल्या जातील

सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, अशी स्क्रिप्ट किंवा अ‍ॅक्टींग नसावी ज्यामुळं लोकांच्या भावना दुखावल्या जातील. तु्म्ही कलम 32 अंतर्गत याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आम्ही कोणत्या अधिकारानं सुनावणी द्यावी. तुम्ही कलम 32 अंतर्गत कोणत्या आधारावर याचिका दाखल केली आहे असा सवालही कोर्टानं केला आहे.

अटकेवर स्थगिती देण्याचा आदेश देण्यास नकार

सुप्रीम कोर्ट म्हणालं की, आम्ही एफआयआर क्लब करण्याच्या मागणीवर विचार करू. सुप्रीम कोर्टानं राज्यात दाखल असलेल्या एफआयआरवर स्थगिती देण्यास नकार दिला. वेब सीरिज तांडवचे निर्माता, लेखक, अभिनेता यांच्या विरोधात देशभरात दाखल एफआयआर क्लब करण्याबाबत सुप्रीम कोर्टानं नोटीस जारी केली. सोबतच अंतरिम प्रोटेक्शन देण्यास नकार दिला. कोर्टानं अटकेवर स्थगिती देण्याचा आदेश देण्यास नकार दिला. 4 आठवड्यांनंतर पुढील सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, या दिलाशासाठी हाय कोर्टात जावं.