Photo : ‘आर्ची’च्या ‘ग्लॅमसर लुक’ची सोशल मीडियाला ‘भुरळ’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सैराट फेम अभिनेत्री रिंकु राजगुरू गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. आपले अनेक नवनवीन फोटो ती सोशलवर शेअर करत असते. पु्न्हा एकदा रिंकु सोशलवर चर्चेचा विषय बनताना दिसत आहे. याला कारण म्हणजे तिचे ग्लॅमरस फोटो आहे. सध्या तिचे काही नवीन फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

⚘💃😊

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

रिंकुने एका कार्यक्रमातील आपल्या लुकचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. नेहमीच आपल्या फोटोंनी चाहत्यांचं मन जिंकणाऱ्या रिंकुने यावेळीही चाहत्यांना आपल्या हटके लुकने भुरळ घातली आहे. चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी रिंकु सोडत नाही. मग तो अभिनय असो किंवा ग्लॅमरस लुक असो. चर्चेत येणे रिंकुला अगदी सहज जमतं.

रिंकुचे याआधी साडीमधील काही फोटो समोर आले होते जे प्रचंड व्हायरल झाले होते. चाहत्यांना रिंकुचा साडीमधील लुक प्रचंड आवडतो. त्यामुळे रिंकु अनेकदा साडीमध्येही दिसते.

रिंकुच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सैराट सिनेमात सर्वांच्या काळजाला हात घालणारी आर्ची म्हणजेच रिंकु काही दिवसांपूर्वीच कागर या सिनेमात दिसली होती. यानंतर तिच्याकडे अनेक सिनेमे आले आहेत. काही दिवसांपूर्वीच तिच्या मेकअप या आगामी सिनेमाचा टीजरही समोर आला होता. रिंकुच्या या ट्रेलरला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता.

सैराटच्या यशानंतर रिंकुला अनेक सिनेमांच्या ऑफर येत होत्या. चांगल्या पटकथा असणारे सिनेमे निवडण्याचा सुरुवातीला तिने निर्णय घेतला होता.

View this post on Instagram

💃😊

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

View this post on Instagram

#redcarpetlook#zee talkies#

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

View this post on Instagram

😊 Picture Courtesy: @akki_paranjape_

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

View this post on Instagram

Kagar promotion 🙋‍♀️😎

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

 

Loading...
You might also like