‘केबीसी’ नागराज मंजुळे करणार होस्ट

मुंबई : वृत्तसंस्था – अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. हा शो अमिताभ बच्चन हिंदी मध्ये होस्ट करतात. हा शो अगदी कमी वेळेत घराघरात पोहचला. या शोची लोकप्रियता पाहून मराठीत सुद्धा हा शो सुरु करण्यात आला. मराठीमध्ये दोन पर्वाला यश मिळाल्यानंतर तिसऱ्या सीजन आणि त्याच्या सूत्रसंचालना विषयी माहिती समोर आली आहे. या तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन नागराज मंजुळे करताना दिसणार आहे.

याच्या पहिल्या पर्वाच सचिन खेडेकर यांनी सूत्रसंचालन केलं होत. दुसऱ्या भागाची जबाबदारी स्वप्नील जोशीने स्वीकारली होती. आता याच्या तिसऱ्या पर्वात दिग्दर्शक नागराज मंजुळे शो होस्ट करताना दिसणार आहे.

कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून या शोचे सूत्रसंचालन कोण करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. अखेर यावरून पडदा उठत नागराज मंजुळे शोचे सूत्रसंचालन करणार असल्याचे समोर आले आहे. हा शो नेमका कधी सुरू होणार हे मात्र स्पष्ट झालेलं  नाही.

पण पुन्हा एकदा या शोच्या माध्यमातून सामान्यांचे स्वप्न पूर्ण होऊन अनेकांचे नशीब पालटणार हे मात्र नक्की. आता सैराट चे दिग्दर्शक हा शो कसा होस्ट करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच लागली असणार.