#Video : आर्ची-परश्याचा ‘सैराट’ आता छोट्या पडद्यावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाचे वेड महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील होते. या चित्रपटाने रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवले होते. ‘सैराट’ चित्रपटात जातीय व्यवस्था, जाती-धर्मापलीकडे फुललेल्या निष्पाप प्रेमेचा, प्रेमातून बाहेर पडल्यानंतरच्या वास्तव्याचा आणि पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही न बदललेल्या गोष्टी दाखविण्यात आल्या. मोठ्या पडद्यावर गाजवल्यानंतर ‘सैराट’ चित्रपट आधारित एक हिंदी मालिका छोट्या पडद्यावर सुरु होणार आहे.

या मालिकेचे नाव ‘जात ना पूछो प्रेम की’असे ठेवण्यात आले आहे. तसेच या मालिकेत ‘शाका लाका बूम बूम’ मधील अभिनेत्री किंशूक वैद्य, अभिनेत्री प्रणाली राठोड हे आर्ची आणि परश्याच्या भूमिका साकरणार आहे. आर्ची आणि परश्याची कहाणी उत्तर मालिकेत घडणार आहे. ‘जात ना पूछो प्रेम की’ या मालिकेची घोषणा अ‍ॅड टीव्हीचे विष्णू शंकर यांनी चित्रपटात दाखवेली कथा प्रेक्षकांपर्यंत पोहचावी म्हणून टीव्ही हे माध्यम उत्तम म्हणले आहे. आता चाहत्यांना या मालिकेच्या सुरुवातीची उत्सुकता लागली आहे.

‘सैराट’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाण्यासोबत आर्ची-परश्याचे डायलॉग ही प्रेक्षकांना तोंड पाठ होते. या चित्रपटाची मालिका येणार यामुळे प्रेक्षक खुपच उत्सुक आहेत. नक्कीच ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल.