Sajid Khan | “तो माझ्या प्रायव्हेट पार्टकडे ५ मिनिटे पाहत राहिला”, साजिद खानवर ‘या’ अभिनेत्रीने केला गंभीर आरोप

पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट निर्माता साजिद खान (Filmmaker Sajid Khan) मागील काही दिवसांपासुन चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान अशातच त्याने बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये प्रवेश केल्यापासून तर तो आणखीच चर्चेत आला आहे. महत्वाची बाब म्हणजे साजिद खानवर (Sajid Khan) अनेक मुलींचा छळ केल्याचा आरोप होता. त्यामुळे अनेक अभिनेत्रींनी MeToo आरोपी साजिद खानला बिग बॉस 16 शोमध्ये पाहून नाराजी व्यक्त केली आहे. फक्त नाराजीच नाही, तर अनेक अभिनेत्रींनी साजिद खानबद्द्ल अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत . दरम्यान अशातच आता पुन्हा एकदा एका अभिनेत्री तसेच मॉडेल शीला प्रिया सेठने (Model Sheela Priya Seth) साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. (Sajid Khan)

 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शीला प्रियाने साजिद खानवर आरोप केला आहे की, 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 मध्ये साजिद खानने तिला चुकीची वागणूक (Sajid Khan Misbehavior) दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार शीला म्हणाली की, ” मी साजिद खानला 2008 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. मी त्याला त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये मला कास्ट करण्याची विनंती केली. पण त्याच्या चुकीच्या कृत्यामुळे मी त्याला नकार दिला. (Sajid Khan)

 

पुढे बोलताना शीला म्हणाली की, “तो माझ्या प्रायव्हेट पार्टकडे ५ मिनिटे पाहत राहिला. इतकच नाही तर त्याने मला सांगितले की तू शस्त्रक्रिया करावी कारण बॉलिवूडसाठी तुझ्या स्तनाचा आकार परिपूर्ण नाही. तसेच माझ्या स्तनाला मसाज करण्यासाठी मी थोडे तेल वापरावे आणि त्यानंतरच मी बॉलीवूडमध्ये काम करू शकणार असेही त्याने सांगितले. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, साजिद खानवर शीलाने कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. कृपया सांगा की शीला प्रिया, शर्लिन चोप्रा, राणी चॅटर्जी, कनिष्क सोनी यांनी गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान आता साजिद खानला शोमधून बाहेर काढण्यासाठी शर्लिन चोप्रा पोलिसांपर्यंत पोहोचली आहे.

साजिद खान बॅकफूटवर खेळतोय
एकीकडे साजिद खानवर अनेक अभिनेत्रींनी गंभीर आरेप केले आहेत. तर दुसरीकडे, साजिद खान बिग बॉसमध्ये खूप सुरक्षित खेळत आहे.
दरम्यान साजिद खानला काही लोक शोमध्ये पसंत करत आहेत तर काही लोकांना त्याचा खेळ समजू शकलेला नाही.
कारण अध्याप या शोमध्ये साजिद खान उघडपणे खेळाताना दिसलेला नाही. परंतु शोमध्ये एक-दोनदा त्याला रागही आला,
पण थोड्या वेळाने तो जाऊन सगळ्यांशी मैत्री करतो.
म्हणुन साजिद खान आपली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी शांत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रेक्षकांचे मत आहे.

 

Web Title :- Sajid Khan | bigg boss season 16 actress and model sheela priya seth shocking revelation against sajid khan know what she said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Katrina Kaif Pregnant | कतरिना कैफ आहे प्रेग्नंट?, व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे बेबी बंप

Pimpri Pune Crime | देवदर्शनासाठी गेलेल्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, 20 लाखांचा ऐवज लंपास

Supriya Sule | जितेंद्र आव्हाडांनी राजीनाम्याचा विषय डोक्यातून काढून टाकावा – सुप्रिया सुळे