अखेर ‘भाईजान’ सलमान बरोबर असलेल्या नात्याबद्दल कतरिनानं सांगितलं (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याची अनेक अभिनेत्रींबरोबर प्रेम प्रकरणे राहिली आहेत. यामध्ये कतरीना कैफ आणि सलमान खान यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना जास्त प्रमाणात आवडते. त्याचबरोबर सलमान आणि कतरीना नात्यात असल्याच्या अफवा देखील अनेकवेळा उडवल्या जातात. मात्र नुकतेच कतरिनाने सलमान आणि तिच्या नात्यावर मनमोकळेपणाने भाष्य केले.

सलमान आणि तिच्या नात्याविषयी बोलताना ती म्हणाली कि, ज्याप्रमाणे पडद्यावर आमची केमिस्ट्री दिसते तशी रिअल लाईफमध्ये नाही, मात्र तरीदेखील तो मला खूप मदत करत असतो. एक चांगला मित्र म्हणून तो नेहमीच माझी मदत करत असतो. त्यामुळे तो माझा फक्त चांगला मित्र आहे. ज्यावेळी मी आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात होते, त्यावेळी त्याने मला खूप मदत केली होती. त्यावेळी प्रत्येक संकटात तो माझ्यामागे उभा होता. त्यामुळे मी सलमानवर विश्वास ठेऊ शकते. त्याचबरोबर तिने सलमानच्या दोन बहिणी अर्पिता आणि अलवीरा यांच्याशी असलेल्या नात्यावर देखील भाष्य केले. त्यांच्याविषयी बोलताना ती म्हणाली कि, जितका सलमान मला जवळ आहे तितक्याच मला या दोघी देखील जवळ असल्याचे तिने सांगितले.

दरम्यान, सलमान खान आणि कतरीना कैफ यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांत काम केले असून नुकताच त्यांचा भारत हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.