‘भाईजान’ सलमान करणार 29 वर्षांनी लहान अभिनेत्रीशी ‘रोमँन्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सारा अली खान आणि बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान एकत्र काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी सारानं मेकर्सची भेट घेतल्याचंही समजत आहे. जर सारा आणि सलमाननं एकत्र काम केलं तर सारा-सलमानचा हा पहिलाच सिनेमा असेल.

View this post on Instagram

Work in progress…

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

एका वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार, आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमात सारा अली खान आणि सलमान खान स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. तिनं यासाठी निर्मात्यांची भेटही घेतली आहे. आनंद एल राय यांना सारानं सिनेमात घेण्यासाठी विनंती केल्याचंही समजत आहे.

आणखी एका इंग्रजी वृत्तानुसार, आनंद एल राय यांना आधीपासूनच सलमान खानला सिनेमात घ्यायचं होतं, ज्यासाठी ते तयारी करत होते. यानंतर अभिनेत्री म्हणून सारा अली खानचं नाव पुढे येत आहे. असे समजत आहे की, या सगळ्या शक्यताच आहेत. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अद्याप सिनेमाचं नाव काय असेल हेही समोर आलेलं नाही.

View this post on Instagram

Woh mere peche wire kis cheez ka hai . . Can u guess pls?

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच तो दबंग 3 सिनेमात दिसणार आहे. साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाला तर लवकरच ती लव्ह आज कल 2 आणि कुली नंबर 1 अशा सिनेमात दिसणार आहे. लव्ह आज कल मध्ये ती कार्तिक आर्यन आणि कुली नंबर 1 च्या रिमेकमध्ये ती वरूण धवन सोबत दिसणार आहे.

View this post on Instagram

🍯➡️🧸 🥜➡️🐿 . 👁➡️🙌🏻

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like