‘भाईजान’ सलमाननं टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकडची काढली आठवण ! फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या सेटवरून नुकतीच एक वाईट बातमी समोर आली होती. शोच्या सेटबाहेर 2 टीम मेंबरचा भीषण अपघात झाला होती. शोची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड (Pista Dhakad) हिचा या अपघातात मृत्यू झाला होता. असं सांगितलं जात आहे की, तिला खूप जास्त इजा झाली होती. जास्त रक्त वाहिल्यानं तिचा मृत्यू झाला. आता सलमान खान (Salman Khan) यानही पिस्ताच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

सलमाननं त्याच्या ट्विटरवरून पिस्ता सोबत एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना सलमान म्हणतो, रेस्ट इन पीस पिस्ता.

सलमानची ही पोस्ट सध्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. सलमान व्यतिरीक्त बिग बॉस 13 चा हिस्सा राहिलेली काम्या पंजाबी हिनंही पिस्ताची आठवण काढली.

अ‍ॅक्सिडेंटमध्ये झाला पिस्ताचा मृत्यू

शुक्रवारी बिग बॉस 14 च्या टीमनं सलमान खान सोबत वीकेंड वॉर शुट केलं होतं. पॅकअपनंतर पिस्ता तिच्या स्कुटीवरून गेली होती. रस्त्यावरील अंधारामुळं तिचा स्कुटीवरील कंट्रोल सुटला आणि स्कुटी घसरून एका खड्ड्यात गेली. यावेळी पिस्ता सोबत एक सहकारी होता. दोघंही जोरात आपडले.

असा झाला अपघात

जेव्हा पिस्ता पडली तेव्हा मागून एक व्हॅनिटी व्हॅन येत होती जी तिच्या अंगावरून गेली. 24 वर्षीय पिस्ताचा जागीच मृ्त्यू झाला.

पिस्तानं बिग बॉस व्यतिरीक्त खतरों के खिलाडी मध्येही काम केलं आहे. अनेक स्टार्स सोबत तिचे चांगले संबंध होते. पिस्ताच्या मृत्यूनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. परंतु शोचे मेकर्स किंवा सलमान खान यांच्याकडून अद्याप कोणतंही स्टेटमेंट जारी करण्यात आलेलं नाही.