‘रेस-४’ या चित्रपटात सलमान नाही, तर दिसणार ‘हा’ अभिनेता

मुंबई : वृत्तसंस्था – सलमान खान याचा ‘रेस-३’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर ‘रेस-४’ या चित्रपटातून त्याचा पत्ता साफ करण्यात आला असून त्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागणार आहे. सलमान सध्या आगामी ‘भारत’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटानंतर तो लगेचच ‘दबंग-३’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. त्यामुळे ‘रेस-४’ मध्ये त्याला जागा मिळणार नाही.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘रेस-४’ मधून सलमान बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागेवर आता सैफ अली खानची वर्णी लागली आहे. ‘रेस’ सिरिजचे निर्माते लवकरच ‘रेस-४’ च्या तयारीला लागले आहेत. यात सैफ अली खान मुख्य भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. सैफ अली खानने या आधीही ‘रेस’ आणि ‘रेस-२’ मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. हे दोन्हीही चित्रपट सुपरहिट झाले होते.
‘रेस-३’मध्ये मात्र सलमान खानने मुख्य भूमिका साकारली होती. कमाईच्या बाबतीत जरी या चित्रपटाने यश मिळविले असले, तरी प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे आता सलमानच्या जागी पुन्हा सैफला संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us