Salman Khan | सलमान खानच्या नावाचा व कंपनीचा होत आहे गैरवापर; नोटीस केली जारी

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) यांच्या नावाचा कोणीतरी गैरवापर करत असल्याची बाब समोर आली आहे. यासाठी सलमान खानने स्वतः नोटीस जारी केली आहे. अभिनेता सलमान खान व त्याच्या प्रोडक्शन कंपनीचे (Production Company) नाव वापरुन कोणी फसवणूक (Cheating Case) करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा आशयाची नोटीस सलमान खानने (Salman Khan) सोशल मीडियावर शेअर केली आहे.

 

 

 

 

 

 

 

मनोरंजन विश्वातील बढ्या नावांचा गैरवापर करत फसवणूक केली जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. काही रिपोर्टनुसार आता अभिनेता सलमान खान व त्याच्या प्रोडक्शन कंपनीचे (Salman Khan Production) नाव वापरत चित्रपटाचे ऑडिशन (Audition) घेत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मनोरंजन विश्वामध्ये ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असलेल्या नवोदित कलाकारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या बाबत स्वतः सलमान खानने नोटीस काढली आहे. व सोशल मीडियावरही पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने त्याच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.

 

 

 

 

 

 

 

सलमानने लिहिलेल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे कोणतीही ऑडिशन चालू नसल्याचे सांगितले आहे. त्याने लिहिले आहे की, “सलमान खान किंवा सलमान खान फिल्म्स कंपनीकडून सध्या कोणत्याही चित्रपटासाठी कास्टिंग केलं जात नाहीये. याबरोबरच पुढील चित्रपटांसाठी आम्ही कोणत्याही कास्टिंग एजेंटला काम दिलेलं नाही. त्यामुळे वरील कारणासाठी तुम्हाला कुणी संपर्क केला तर त्यावर विश्वास ठेवू नका. सलमान खान आणि त्याच्या कंपनीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

 

 

 

 

 

सलमानने 2011 साली त्याची आई सलमा खानसोबत (Salma Khan) प्रोडक्शन कंपनी स्थापित केली. सलमान खानच्या सलमान खान फिल्म्स (Salman Khan Films) अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. सलमानने ‘चिल्लर पार्टी’ या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. त्यानंतर बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijaan), राधे (Radhe), दबंग 3 (Dabangg 3), रेस 3 (Race 3), नोटबुक (Notebook), टुबलाईट (Tubelight) व अंतिम (Antim) यासारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती एसकेएफ (SKF) कंपनी मार्फत करण्यात आली आहे.

Web Title : Salman Khan | salman khan shares official notice on casting for films under his production house

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुने कपडे घेण्याच्या बहाण्याने घरात चोरी, शिवाजीनगर पोलिसांकडून परराज्यातील दोन महिलांना अटक

Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील अप्पर पोलिस अधीक्षक (Addl SP), उप अधीक्षक (DySP)/ सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) दर्जाच्या 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ACB Trap News | ग्रामपंचायत सदस्याकडून लाच घेताना पंचायत समितीतील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना एसीबीकडून अटक

Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीने सांगितला पहिल्या डेटचा किस्सा; “आम्ही बागेत फिरलो…”

Pune CoOperative Court | विद्यार्थी भाडेकरूसाठी लेखी परवानगी मागणाऱ्या सोसायटीला कोर्टाचा दणका