Salman Khan | सलमान खानने दिल्या शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून खास प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन – Salman Khan | अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. ‘जवान’ चित्रपटाच्या ट्रेलरने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Jawan Movie) प्रेक्षकांनाही या चित्रपटाचा थरारक ट्रेलर व जबरदस्त ॲक्शन सीन आवडले आहेत. अनेकांनी ‘जवान’ चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले आहे. यामध्ये आता अभिनेता सलमान खान (Salman Khan) दाखल झाला आहे. सलमानने शाहरुखच्या आगामी ‘जवान’ चित्रपटासाठी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

अभिनेता सलमान खान व अभिनेता शाहरुख खान या दोघांचा चाहता वर्ग तगडा आहे. (Salman And Shah Rukh) दोघांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. या दोघांना एकत्र काम करताना पाहण्याचे अनेकांचे स्वप्न होते. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटामध्ये सलमान खानने पाहुणा कलाकार म्हणून एन्ट्री घेतली होती. (Salman Khan In Pathan) आता भाईजानने (Bollywood Bhaijan) बॉलीवूडच्या किंग खानला (Bollywood King Khan) आगामी ‘जवान’ चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. सलमानने शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सलमान खानने जवान चित्रपटाचा ट्रेलर (Jawan Movie Trailer) ट्वीट केला आहे. यावेळी सलमानने, “पठाण जवान बन गया, उत्कृष्ट ट्रेलर, मला खूप आवडला. आता हा चित्रपट फक्त चित्रपटगृहातच पाहायला हवा. मला खात्री आहे की पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहणार. मजा आ गया वाह…” अशा शब्दांत जवान चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. सलमानाच्या या शुभेच्छांचा स्वीकार करत शाहरुखनेही रिट्वीट केले आहे. (Salman On Jawan) शाहरुखने लिहिले आहे की, “यामुळेच भाई तुला पहिल्यांदा दाखवला होता!! तुझ्या शुभेच्छाबद्दल आणि पहिले तिकीट आधीच बुक केल्याबद्दल धन्यवाद. लव्ह यू.” अभिनेता शाहरुख व सलमान मधील प्रेम पाहून चाहते खूश आहेत.

अभिनेता शाहरुख खानचा आगामी जवान चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर शाहरुख ‘डंकी’ (Dunki) चित्रपटामध्ये झळकणार आहे. तसेच सलमान खान ‘टायगर 3’ (Tiger 3) मध्ये कतरिना कैफ (Katrina Kaif) सोबत दिसणार आहे. ‘टायगर 3’ मध्येही सलमान खानसोबत (Salman Khan) शाहरुख खान (SRK In Tiger 3) झळकणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title :   Salman Khan | salman khan was also speechless after seeing the preview video of shah rukh khans jawaan said this thing

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा