Dr. Neelam Gorhe | ‘ठाकरे गटात संवादाचा अभाव, या कार्यपद्धतीला कंटाळून मृत्यूची वाट पाहत होते’, निलम गोऱ्हे यांचे धक्कादायक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील अनेक वर्षापासून ठाकरेंसोबत एकनिष्ठ असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी देखील उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडली. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला (Thackeray Group) पुन्हा एकदा मोठा धक्का बसला. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी ठाकरे गट का सोडला याची कारणे सांगितली.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेकांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी देखील ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत, यावर त्यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले आहे.

ठाकरे गटात संवादाचा अभाव

निलम गोऱ्हे म्हणाल्या, ठकरे गटामध्ये संवादाचा अभाव आहे. मी कोणतही पद डोळ्यासमोर ठेऊन गेलेले नाही. शिंदे गुवाहाटीला गेले तेव्हा हा विषय तात्पुरता आहे असं वाटलं होतं. माझे अनेक ठिकाणी दौरे होत होते. मात्र पक्ष कार्यकर्ते फुटण्यापेक्षा समाजातच दुभंगत चालले होते. शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकांचे प्रश्न कोण घेतच नव्हते. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी घेतलेल्या भूमिका एकनाथ शिंदे घेत होते, त्यामुळे मी हा निर्णय घेतल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

एका दिवसात कोण पक्ष बदलत नाही

एक दिवस पक्षात काही झालं म्हणून कोण पक्ष बदलत नाही. जानेवारी महिन्यात माझी आई आजारी पडली. तिचा 20 तारखेला मृत्यू झाला.
तेव्हा उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. पण, त्यावेळी ताबडतोब एकनाथ शिंदे भेटण्यासाठी आले.
तर दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आले होते. माझी अपेक्षाही नव्हती आम्ही त्यांना कळवलेही नव्हते.
मला यावेळी हे थोडे कृतीशील आहेत असं वाटलं. दुसरं मी सातत्याने मेसेज करुन महिनाभर उत्तराची वाट पाहत बसायची.
या कार्यपद्धतीला मी वैतागले होते. लोक म्हणत होते तुम्हाला अक्सेस आहे, पण या अक्सेसचा काय उपयोग, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

मी मृत्यूची वाट पाहत होते

मला त्यांनी भरपूर पदं दिली. मला काय द्यायचं ठेवलं नाही. पण मी या कार्यपद्धतीला कंटाळून मृत्यूची वाट पाहत होते, त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही उपसभापती करता, पण तुम्हाला नेता करावेसे वाटले नाही.
अनेकवेळा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) बोलायला दिले. पण महत्त्वाच्या निर्णयावेळी बोलावलं जात नव्हत, असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर चर्चेची दारं बंद झाली

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आणि आजारी पडल्यानंतर चर्चेची दारं बंद झाल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. आता त्यांना जास्त त्रास देयला नको म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले.

एवढं बंदिस्त राजकारण होईल असं…

उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हावेत ही माझी इच्छा होती. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्ष संघटनेमध्ये गती येईल असं वाटलं होतं.
मात्र तस झालं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढं बदिस्त राजकारण होईल असं वाटलं नव्हतं.
त्यांचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवलं तर जाईन पण पक्षात प्रवेश करणार नसल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.

Web Title : Dr. Neelam Gorhe | there was no other party in mind i was waiting for death dr neelam gores shocking statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा