Thalapathy Vijay | राजकारणामध्ये प्रेवश करण्याआधीच अभिनेता विजयवर झाली नियम मोडल्याबद्दल कारवाई

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य अभिनेता थलापति विजय (Thalapathy Vijay) हा मनोरंजन विश्वामध्ये चर्चेत आला आहे. तो लवकरच सिनेविश्वाबरोबरच राजकारणातही सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. थलापति विजय हा प्रसिद्ध अभिनेता असून तो आता नेता होण्याच्या मार्गावर आहे. (Vijay In Politics) त्याचे विजय मक्कल इयक्कम (VMI) च्या सदस्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र या भेटीनंतर अभिनेता थलापति विजय (Thalapathy Vijay) याने वाहतूकीच्या नियमांचे धडाधड उल्लंघन केले. याचा त्याला फटका बसला आहे. वाहतूक पोलिसांकडून नियम मोडल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.

अभिनेता थलापति विजय हा ‘लियो’ चित्रपटाच्या (‘Leo’ Movie) शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तो लवकरच राजकारण क्षेत्रातही कार्यरत होणार आहे. सोमवारी (दि.10) रोजी त्याने विजय मक्कल इयक्कम (VMI) च्या सदस्यांचीही भेट घेतली होती. त्याने पार्टीच्या सदस्यांसोबत चर्चा केली व त्याचे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. मात्र या भेटीनंतर त्याने व त्याच्या ड्रायव्हरने वाहतूकीचे नियम मोडले. (Vijay Traffic Violation) लाल सिग्नल असतानाही त्याने सुसाट गाडी पळवली. त्याने दोन पेक्षा अधिक ठिकाणी रेड सिग्नल मोडले. यामुळे अपघाताचीही शक्यता होती. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे थलपती विजयला पोलिसांनी 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. नेता असो, अभिनेता असो वा सामान्य नागरिक सर्वांसाठी नियम सारखेच आहेत असे यामधून अधोरेखित होत आहे.

सुप्रसिद्ध अभिनेता थलापति विजय (Thalapathy Vijay) याचे नियम मोडणाऱ्या गाडीचे व त्यावर कारवाई झालेल्या चलानांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये गाडीच्या मालकाचे नाव स्पष्ट दिसत आहे. चाहत्यांपासून सुटकारा मिळवण्यासाठी त्याने नियम मोडले असल्याचे सांगितले जात आहे. चाहत्यांनी थलापति विजयचा पनयूर ते निलंगराई येथील त्याच्या घरापर्यंत पाठलाग केला. या चाहत्यांपासून वाचण्यासाठी त्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title : Thalapathy Vijay | thalapathy vijay fined for violating traffic rules during chennai meeting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा