‘भारत’ चित्रपटात दिसणार सलमान खानचे ‘हे’ ५ वेगवेगळे लुक

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा चित्रपट ‘भारत’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ईद दिवशी प्रदर्शित होणार आहे. आत्तापर्यंत चित्रपटाचे पोस्टर्स, गाणे, टीजर, ट्रेलर आणि डायलॉग प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. ज्यामध्ये सलमान खान वेगवेगळ्या रुपात दिसून येत आहे. बॉलीवूडच्या अहवालानुसार, १९४७ ते २०१० पर्यंत चित्रपटांची कथा दाखविली गेली आहे. पोस्टर बघितल्यानंतर लक्षात येईल की सलमान खानचे किती रूप आहेत.

सलमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून त्याचे वेगवेगळे लुक शेयर केले आहेत. सलमानचे तरुण पणापासूनचे तर वृद्ध होईपर्यंत वेगवेगळ्या अवस्थेत दिसून येतील. चित्रपटात सलमानला ५ रूपात दर्शवले गेले आहे.

सलमानचे ५ वेगवेगळे रूप :

रेट्रो लुक – भारत चित्रपटात पहिले रेट्रो लुक दिसून येणार. १९६४ चा हा लुक भारतातील तरुणांचा दृष्टीकोन आहे. ज्यामध्ये तो रशियन सर्कसमध्ये कार्य करतो.

खाण कामगार – यानंतर सलमानचे नवीन स्वरूप उघड होईल, ज्यात तो खाणी कामगार म्हणून दिसेल. १९७० चा दशकातील हे पात्र. या लुक मध्ये रेट्रो लुक पेक्षा वेगळी मूंछ दाखवली आहे.

नौसेना अधिकारी – भारताची कथा जशी-जशी पुढे जाते तस तसा त्याचा नवीन लुक सगळ्यांचा समोर येतो आहे. हा लुक १९८५ चा आहे ज्या मध्ये तो नौसेना अधिकारी बनला आहे.

मध्ययुगीन – यानंतर सलमान खान १९७० मध्ये दिसून येईल. ज्यात त्याच्या मध्यम-शिक्षित सिम्पल असा लुक आहे. त्याचा चेहऱ्यावर दाढ़ी दिसून येईल.

वयस्कर व्यक्ती – सलमान देखील या चित्रपटात वृद्ध व्यक्तीचे पात्र करणार आहे. हे पात्र २०१० मधील आहे. ज्यामध्ये त्याचे पके केस आणि पांढरी दाढी दिसत आहे. त्यात सलमानने चष्मा घातला आहे.