‘लॉकडाऊन’मध्ये ‘भाईजान’ सलमानचं नवीन गाणं ‘रिलीज’ ! जॅकलीनसोबत रोमँटीक अंदाज चाहत्यांना ‘भावला’ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार सलमान खानचं प्यार करोना हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं होतं. या गाण्याला खूप पसंती मिळाली होती. यानंतर आता त्याचं दुसरं गाणं तेरे बिना या गाण्याचा टीजर कालच रिलीज करण्यात आला आहे. यानंतर आता हे गाणंही रिलीज झालं आहे. रिलीज होताच गाण्यांला हजारो लोकांनी पाहिलं आहे.

सलमान खानच्या तेरे बिना या गाण्यात जॅकलीन फर्नांडिस आणि त्याची रोमँटीक केमिस्ट्री दिसत आहे. यात बाईक रायडिंग आहे. याशिवाय जॅकलीन बिंधास्त अंदाजात घोडेस्वारी करताना दिसत आहे. म्हशीचं दूध काढत आहे. स्विमिंग करत आहे. असे सीन्स आहे. एका सीनमध्ये सलमान तिला उचलूनही घेतो. या गाण्यातील रोमँटीक अंदाजात चाहत्यांना खूप आवडला आहे.

सलमान खाननं जॅकलीन फर्नांडिससोबत अलीकडेच एक मुलाखत दिली. यात बोलताना तो म्हणाला होता की, “एक गाणं माझ्या डोक्यात होतं म्हटलं चला या काळात रिलीज करूया. आमच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये माझा लहानपणीचा मित्र राहतो त्याचं नाव आहे अज्जु भाटिया. त्यानं हे गाणं ऐकवलं तर मला खूप आवडलं. तो म्हणाला की, हे असं गाणं आहे जे कोणत्याही सिनेमात फिट होत नाही. मी विचार केला की, इथंच हे गाणं रिलीज करू. आपलं प्रॉडक्शन हाऊस तर आहेच.”