Samantha Ruth Prabhu | “मागचे सहा महिने होते सर्वांत कठिण…” समंथा रुथ प्रभूने मांडली व्यथा

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. समंथाचा चाहता वर्ग देशभर असून मोठा आहे. ती बॉलीवुडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यास तयार आहे. अभिनेत्री समंथा (Samantha Ruth Prabhu) हिचे तिच्या चाहत्यांसोबत चांगले बॉन्डींग असून ती चाहत्यांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही. समंथा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांशी सगळे शेअर करते.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिची मोठी फॅन फोलोविंग आहे. समंथा सोशल मीडियावर तिच्या लाईफ अपडेट व आगामी प्रोजेक्ट बद्दल स्वत: सांगत असते. तिने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने जांभळ्या रंगाचा टॉप घातला असून केस मोकळे सोडले आहे. यामध्ये तिने आपल्या चहात्यांना मागचे सहा महिने कठीण असल्याचे सांगितले आहे. समंथाने फोटो स्टोरीला शेअर करत लिहिले आहे की, “हे सर्वात मोठे आणि कठीण सहा महिने गेले आहेत. ते आता समाप्त होत आहेत.”

समंथाच्या या स्टोरीमुळे चाहत्यांनी तिच्या आऱोग्याची चौकशी केली आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही ‘मायोसिटिस’ (Myositis) या आजाराने ग्रस्त आहे. याच मुळे तिने आता सिनेविश्वातून एक वर्षासाठी ब्रेक घेतला असल्याचे काही रिपोर्टमधून सांगण्यात येत आहे. (Samantha Ruth Prabhu Healthissue) पुढील एक वर्ष ही कोणताही सिनेमा करणार नसून तिने अडव्हान्स घेतलेल्या निर्मात्यांचे पैसे देखील परत केले आहेत. समंथा नुकतीच ‘द फैमिली मैन 2’ (The Family Man 2) या वेबसीरिजमध्ये झळकली. तिची ही वेबसिरिज खूप गाजली. यानंतर ती अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सोबत ‘सिटाडेल’ या चित्रपटात (Citadel Movie) स्क्रीन शेअर करणार आहे. त्याचबबरोबर ती दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याच्यासोबत ‘खुशी’ (Khushi Movie) चित्रपटात देखील झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव निर्वाण (Shiva Nirvana) यांनी केले आहे. आता मात्र समंथा तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणार असून तिने सिनेविश्वातून मोठा ब्रेक घेतला आहे.

Web Title : Samantha Ruth Prabhu | samantha ruth prabhu instagram post says last six months were hardest and longest but made it to an end

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress Protest Against BJP Govt | काँग्रेसचे भाजपाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध तीव्र आंदोलन ! ‘भाजप’ वॉशिंग मशीन, ‘मोदी’ वाशिंग पावडर

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे बनले?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट; म्हणाले…

Satara Crime News | धक्कादायक! जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् 15 मिनिटानंतर बाप-लेकाचा मृत्यू

Uddhav Thackeray | ‘मर्दाची औलाद असाल तर या सरकारी यंत्रणा…’, उद्धव ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान (व्हिडिओ)