Samantha Ruth Prabhu | सामंथाने अवघ्या 4 डिग्रीमध्ये घेतला थंडगार आइस बाथ; व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सामंथाने सध्या इंडस्ट्रीपासून एक वर्षाचा मोठा ब्रेक घेतला आहे. सध्या ती बाली मध्ये व्हेकेशन (Bali Vacation) एन्जॉय करताना दिसत आहे. यावेळी सामंथाने तिच्या हेअरचा न्यू लूक देखील केला आहे. सामंथा तिच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे, यामध्ये तिने शॉर्ट केस केले असल्याचे दिसून येत आहे. आता सामंथाने (Samantha Ruth Prabhu) अगदी थंडीमध्ये आइस बाथ (Samantha Ice Bath) घेतला आहे. सामंथाची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://instagram.com/stories/samantharuthprabhuoffl/3155423899139797622?igshid=MTc4MmM1YmI2Ng==

अभिनेत्री सामंथा प्रभू हिने आरोग्यावर लक्ष देण्यासाठी ब्रेक घेत असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी तिचे ईशा फाउंडेशनमध्ये (Isha Foundation) मेडिटेशनसाठी गेली असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता तिने इंस्टाग्रामवर तिची बर्फामध्ये बाथ घेत असल्याची व्हिडिओ शेअर केली आहे. यावेळी 4 डिग्री तापमानामध्ये अभिनेत्री सामंथाने तब्बल 6 मिनिटे आइस बाथ घेतला आहे. यामध्ये सामंथाने डोळे बंद करुन शांत चित्ताने आइस बाथ घेत असल्याचे दिसून येत आहे.

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा मोठा चाहता वर्ग असून तिचे इंस्टाग्रामवर 28.5 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. ती तिच्या चाहत्यांसोबत तिच्या सगळ्या लाईफ अपडेट शेअर करत असते. सामंथाने वर्षभर सिनेविश्वातून ब्रेक घेतला असला तरी तिचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लवकरच सामंथाचा ‘सिटाडेल’ हा चित्रपट (Citadel Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये तिने अभिनेता वरुण धवनसोबत (Actor Varun Dhawan) स्क्रीन शेअर केली आहे. तसेच तिचा ‘खुशी’ चित्रपट (Khushi Movie) येणार असून यामध्ये ती दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Actor Vijay Deverakonda) सोबत झळकणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरडी हटवण्यासाठी पुन्हा ब्लॉक,
उद्या (गुरूवारी) ‘या’ वेळेत प्रवास टाळा