Samantha Ruth Prabhu | एका प्रमोशन इव्हेंटमध्ये समंथा अक्षरशा रडू लागली; जाणून घ्या नेमके काय आहे कारण (VIDEO)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सध्या दाक्षिणात्य अभिनेत्री समंता (Samantha Ruth Prabhu) गेल्या काही महिन्यापासून मायोसिटीस (Myositis) नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. या कारणाने सोशल मीडियावर समंता चर्चेत देखील आहे. ‘पुष्पा’ (Pushpa) सिनेमातील ‘ऊ आटवा’ (U Aathva Ma) या गाण्यामुळे समंताने प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले होते. सध्या समंथा (Samantha Ruth Prabhu) आजाराने जरी ग्रस्त असली तरी तिच्या ‘यशोदा’ (Yashodha) या आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना ती दिसत आहे.

 

समंथाचा यशोदा हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये बिझी असतानाच एका मुलाखतीत समंताला तिच्या आजाराबद्दल विचारले असता तिला बोलता बोलता अश्रू अनावर झाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

 

आजारपणावर बोलताना समंथा (Samantha Ruth Prabhu) म्हणाली, “या आजाराशी लढताना अनेकदा असं वाटलं की आता हा प्रवास इथेच संपला सगळं काही खूपच कठीण आहे. पण मी या आजाराशी लढण्यासाठी तयार होते. मग स्वतःच्या मनाशी निश्चय केला. काही दिवस चांगले तर काही दिवस वाईट असतात. प्रत्येक दिवसाचा अनुभव घेणे महत्त्वाचे असते. असे निराश होऊन चालत नाही. अखेर आपण जिंकतोच हे सगळं कठीण आहे पण मी इथे आहे आणि या आजाराशी लढणार आहे “. असे म्हणत तिच्या डोळ्यातील अश्रू सावरताना ती दिसली.

 

पुढे बोलताना ती म्हणाली, “माझ्या या आजाराविषयी कळाल्यानंतर खूप साऱ्या अफवा कानावर आल्या.
ज्या संताप जनक होत्या. माझी प्रकृती खूपच गंभीर असल्याचे काहींनी लिहिले होते.
मात्र मी सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की हा जीवघेणा आजार नाही.
यातून मी बरी होईल मी अद्याप मेलेली नाही. माझ्या मते अशा हेडलाईन्सची गरज नाही”.
समंताने सिनेमाच्या डबिंग वेळी देखील तिचे फोटोज शेअर केले होते. तिने सलाईन लावून डबिंगचे काम पूर्ण केले होते.

 

 

Web Title :- Samantha Ruth Prabhu | samantha ruth prabhu talks about battling myositis breaks down

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shraddha Kapoor | इतर अभिनेत्रींना मागे टाकत श्रद्धा कपूरने गाठला ‘हा’ सगळ्यात मोठा टप्पा

Leslie Phillips Passed Away | हॅरी पॉटर स्टार लेस्ली फिलिप्स यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन

T20 World Cup | ‘या’ दोन टीममध्ये होणार टी20 वर्ल्ड कपची फायनल, ‘या’ दिग्गज खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी