गुप्तचर विभागाचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा: संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मुख्यमंत्र्यांनी वारीला न येण्याचे कारण सांगताना काही समाज कंटकांकडून वारीत साप सोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला असल्याचे म्हंटले होते. हा अहवाल कोणत्या अधिका-याने दिला हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली. मंगळवारी (दि.२४) संभाजी ब्रिगेडतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे उपस्थित होते.
[amazon_link asins=’B07D5F2NLB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de40868f-8f56-11e8-b216-4bbb32f3e7a4′]
मुख्यमंत्री हे गृहमंत्री देखील आहेत. असे असताना त्यांनी गुप्त अहवाल कसा काय जाहीर केला असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे. तसेच ज्या अधिका-याने अहवाल पाठवला त्या अधिका-याचे नाव मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगावे. अशी मागणीही अॅड मनोज आखरे आणि संतोष शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे.
शिंदे म्हणाले, जाणीवपूर्वक वारीला जायचं टाळायचं आणि त्याचं खापर खोटं बोलून आंदोलन करणा-यांवर फोडायचं काम मुख्यमंत्री करत आहेत. जर गुप्तचर विभागाकडून आलेला कथित अहवाल खोटा ठरला तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल न घेतल्यास आमदार, खासदार यांनाही घेरणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे.