संभाजी मालिकेवर आक्षेप घेणारा शिवभक्त असू शकत नाही- अमोल कोल्हे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – अमोल कोल्हे जर लोकसभा निवडणूक लढणार असतील तर स्वराज्य रक्षक संभाजी हि टेलिव्हिजन मालिका लोकसभा निवडणुकीच्या काळात बंद ठेवावी अशी मागणी समोर आली होती. त्यावर अमोल कोल्हे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी मालिकेला विरोध करणारा हा खरा शिवभक्त अथवा संभाजी भक्त असू शकत नाही असे डॉ.अमोल कोल्हे यांनी म्हणले आहे. राष्ट्रवादीची पिंपरी येथील सभा संपन्न झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

डॉ.अमोल कोल्हे यांचे नाव शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहे. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. तसेच लोक त्यांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. लोकांचे अमोल कोल्हे यांच्या वरील प्रेम आणि प्रतिसाद पाहून राष्ट्रवादी शिरूर लोकसभेचे तिकीट अमोल कोल्हे यांनाच देईल असे सध्या चित्र दिसते आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यास ते शिवसेनेच्या आढळराव पाटलांना चांगलीच टक्कर देतील असे चित्र दिसते आहे.

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांना मिळालेली प्रसिद्धी त्यांना त्यांच्या राजकारणात कामी येत आहे. कारण शिरूर मतदारसंघात लोकांमध्ये त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. तसेच आढळराव पाटलांनी कोल्हेंच्या बद्दल दिलेले जातीवाचक वक्तव्यमुळे मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी पसरली आहे. म्हणून आढळराव पाटील यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे असे म्हणले आहे.

महत्वाच्या बातम्या –

केंद्र सरकारची मोठी घोषणा , ग्रॅच्युइटी करमुक्त !

‘काँग्रेस’ला मोठा धक्का ; मोदींचा कट्टर विरोधक ‘भाजप’च्या वाटेवर 

…म्हणून आपल्या प्रत्येक ट्विटला ‘बिग बी’ देतात नंबर

भारतावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी आम्ही ‘मसूद’चा वापर केला ; पाकिस्तान तोंडघशी

RBI लवकरच जारी करणार २० रुपयाचे नाणे ; ‘ही’ असणार नाण्याची खासियत