मराठा मोर्चासाठी संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र येणार ?

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अद्यापही मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा निघाला नाही. सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण चांगलच तापले आहे.
या पार्श्वभूमीवर, सोलापूरमध्ये सरकारविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे,
अशी माहिती समोर येत आहे. या मोर्चाची भव्य तयारी सुरू करण्यात आली आहे.
संभाजीराजे (sambhaji raje) आणि उदयनराजे जर या मोर्चामध्ये एकत्र येणार असतील तर याला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Pune Fire News | पुण्यालगतच्या सॅनिटायझर तयार करणार्‍या कंपनीला लागलेल्या आगीत 15 होरपळून जणांचा मृत्यू; आगीचं कारण आलं समोर

दरम्यान, १६ जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढणार अशी घोषणा संभाजीराजे (sambhaji raje) छत्रपती यांनी रायगडावरून केली होती.
या पार्श्वभूमीवर जर या मोर्चाला उदयनराजे भोसले यांनी साथ दिली तर मोठ्या प्रमाणात मराठा समाज या मोर्चासाठी उपस्थित होईल,
असं बोललं जात आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतरही कोणताही तोडगा न निघाल्यामुळे खासदार संभाजीराजे (sambhaji raje) भोसले यांनी कोल्हापूरमध्ये मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली.

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 514 रूग्ण ‘कोरोना’मुक्त, नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय आहे.
गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मराठा आरक्षणाविषयी विनंती केली होती. त्यानंतर उद्याची ही भेट महत्त्वाची असणार आहे.

 

Also Read This : 

 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय