आत्महत्या केलेल्या TikTok स्टार समीरचा अखेरचा व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना म्हणाला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   टिकटॉक स्टार समीर गायकवाड (वय 22,रा. वाघोली) याने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी त्याने चाहत्यांना आवाहन करणारा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असूून तो आता व्हायरल होत आहे. यात समीरने म्हटले आहे की, समोरच्याने चहाचे दुकान टाकले म्हणून आपण देखील चहाचे दुकान टाकायचे नसते. तू दूधाच दूकान टाक, त्याला दे अन् दोघे मिळून पुढे जा. पण नाही. आपल्याला तेच टाकायच असते. म्हणजे तो भिकारी आणि आपण कर्जबाजारी. अरे सुधरा खेकड्यांनो, असे त्याने आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

दरम्यान समीरच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. म्युझिक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला होता. समीर पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता.