अभिनेत्री समीरा रेड्डीने शेअर केला मुलीसोबतचा पहिला फोटो, लिहली भावनिक पोस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डीने एक गोंडस मुलीला जन्म दिला आहे. समीराने आपल्या सोशल मिडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये समीराने आपल्या मुलीला घेतले आहे. हा फोटो शेअर करुन समीराने सुंदर नोट लिहली आहे.

समीने लिहले की, ‘या मुलीने मला एक मोठी ताकद दिली आहे. तिला वाटते की, मी मला पुन्हा स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करवा. तिला माहित आहे की, मी सर्व गमावले आहे पुन्हा तिने मला मार्ग दाखविला आहे. मी खुप खुश आहे. लोकांनी मला खूप सपोर्ट केला आहे. मी देवाकडे मुलीसाठी प्रार्थना केली होती आणि मला ते मिळाले त्यामुळे मी खूप आनंदी आहे. ‘

या फोटोमध्ये समीराने अजून एक फोटो पोस्ट केला होता. समीरा रेड्डीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये आपल्या मुलीचा तिने हाथ धरला आहे. समीरा रेड्डीने शुक्रवार १२ जुलैला आपल्या दुसऱ्या बाळाला म्हणजेच मुलीला जन्म दिला. याआधी तिला ३ वर्षाचा एक मुलगा आहे. समीरे रेड्डीने २०१४ मध्ये अक्षय वर्देसोबत लग्न केले होते. लग्नानंतर २०१५ मध्ये तिने मुलाला जन्म दिला.

समीरा रेड्डीने एका मुलाखतीमध्ये आपल्या पहिल्या प्रेग्नेंसीमध्ये आलेल्या अडचणीबद्दल सांगितले होते. पण आता दुसऱ्या प्रेग्नेंसी दरम्यान समीरा खूपच एन्जॉय करताना दिसली. तिने आपल्या प्रेग्नेंसीचे अनेक फोटोशूट केले होते. या फोटोशूटमुळे ती खूप चर्चेमध्ये आली होती. तिने अनेक प्रेग्नंसीचे फोटो आपल्या सोशल मिडियाच्या अकाउंटवर शेअर केले होते. फोटोंमध्ये समीरा खूपच आनंदी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर खूपच ग्लो आला होता. सगळे बेबी बंप फोटो फ्लॉंन्ट करताना समीरा दिसली होती.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या