Samruddhi Kelkar | अखेर अक्षयबरोबरच्या नात्यावर समृद्धी केळकरने सोडले मौन; म्हणाली – ‘तो माझा ……’

पोलीसनामा ऑनलाइन : Samruddhi Kelkar | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री समृद्धी केळकर हिने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने वेळोवेळी जिंकली आहेत. या मालिकेमुळे समृद्धीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. समृद्धी ही तिच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. समृद्धीचे नाव बिग बॉस मराठी विजेता अक्षय केळकर सोबत जोडले जात होते. अखेर आता समृद्धीने यावर मौन सोडले आहे. (Samruddhi Kelkar)

एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या आणि अक्षयच्या नात्यावर भाष्य केले आहे. यावेळी तिला अक्षय केळकर बरोबरच्या नात्याबद्दल विचारण्यात आले असता ती म्हणाली, “ज्यावेळी मी पहिल्यांदा आमच्या दोघांचे व्हिडिओ पाहिले तेव्हा मी कोमात गेले होते. मला माझ्या नातेवाईक, कुटुंब, मित्रमंडळी आणि कलाकारांकडून आमच्या नात्याबद्दल विचारले त्यावर मी आता उत्तर देते. तो माझा खूप चांगला मित्र आहे, त्याहून काहीच नाही. जवळपास आम्ही पाच वर्ष एकमेकांना ओळखतो. मी त्याची बहीण नाही बायको नाही अशी मी कुणीच नाहीये तो माझा केवळ आणि केवळ एक चांगला मित्र आहे”. अशी प्रतिक्रिया समृद्धीने दिली आहे. काही दिवसांपूर्वी दोघांची ‘दोन कटिंग’ ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली आहे. (Samruddhi Kelkar)

समृद्धीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती सध्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स’चा या
कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका करताना दिसत आहे.
यात अभिनेता अंकुश चौधरी परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.
समृद्धीने ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ त्याचबरोबर ‘पुढचं पाऊल’ आणि ‘लेक माझी लाडाची’ या मालिकेमध्ये देखील
भूमिका साकारली होती. समृद्धी एक उत्तम अभिनेत्री आहे त्याचबरोबर ती एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे.
तिने कथ्थकमध्ये अलंकाराची पदवी पटकावली आहे.

Web Title :-  Samruddhi Kelkar | actress samruddhi kelkar open up about realtionship with marathi big boss contestant akshay kelkar