बापरे ! १००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार ‘ही’ कंपनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चिनी मोबाईल कंपन्या बाजारात सर्वच कंपन्यांना टक्कर देत आहेत. याचा प्रभाव आता इतर कंपन्यांवर दिसू लागला आहे. यातच आता कोरियाची सर्वात मोठी कंपनी सॅमसंग आपल्या भारतातील कर्मचाऱ्यांमध्ये कपात करणार आहे. जवळपास १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची माहिती समोर येत आहे. याआधी देखील कंपनीला आपल्या नफ्यात कपात करावी लागली होती. त्यानंतर आता कंपनीला हा मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.

इकॉनॉमिक टाइम्समध्ये आलेल्या माहितीनुसार देशातली सर्वात मोठी कंझ्युमर इलेक्ट्राॅनिक्स आणि मोबाइल फोन बनवणारी कंपनी सॅमसंगनं कर्मचारी कपात करायचं ठरवलंय. त्यांनी सांगितलं की सॅमसंगनं आतापर्यंत टेलिकाॅम डिव्हिजनमधल्या १५० कामगारांना नोकरीवरून काढून टाकलंय. आॅक्टोबरपर्यंत आणखी लोकांची नोकरी जाऊ शकते.

या विभागांत होणार कपात

सेल्स, मार्केटिंग, आरएंडडी, मॅनुफॅक्चरिंग , फायनान्स , एचआर, कॉरपोरेट रिलेशन्स या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात येणार आहे. राजधानी सियोल मधील आपल्या मुख्य कार्यालयातून कंपनीने या प्रक्रियेसाठी सुरुवात केली असून एप्रिल महिन्यापासून सॅमसंगमध्ये जागा भरण्यात आलेल्या नाही. कंपनी सध्या नफा कामविण्यावर विचार करत आहे.

मागील आर्थिक वर्षात

मागील आर्थिक वर्ष म्हणजेच २०१७-१८ मध्ये सॅमसंगचा नफा कमी होऊ लागला. भारतात मोठ्या प्रमाणात शाओमी आणि वन प्लससारखे चिनी ब्रँड आपला विस्तार करत आहे,त्याचप्रमाणे त्यांची विक्री देखील वाढली असल्याने सॅमसंगला कर्मचारी कपात करावे लागणार आहेत. सध्या भारतीय स्मार्टफोनच्या बाजारात शाओमीची भागीदारी २९ टक्के, सॅमसंग २३ टक्के आणि विवोची १२ टक्के आहे. दरम्यान, मागील वर्षी सॅमसंगनं भारतात सर्वात मोठा प्लांट उभारण्याचे काम सुरु केले आहे. तो पुढच्या वर्षी पूर्ण होईल. यासाठी जवळपास ५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.

वजन कमी करण्यासाठी ‘त्रिफळा’ उपयोगी

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

लाकडी कंगवा कमी करतो ‘केसाच्या’ तक्रारी

किचनमधील ‘या’ वस्तू करतील जखमांवर जालीम उपाय

मॉब लिंचिंग विरोधात राज्यात कायदा करण्याची विरोधकांची मागणी

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’