वाळू माफियांचा तलाठ्यावर जीवघेणा हल्ला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन

नाशिकच्या लोहणेर (ता. देवळा) येथे वाळू माफियांचा धुमाकूळ घातला असून गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर २० ते २५ वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी झाले आहेत. अंबादास पुरकर असे त्यांचे नाव असून त्यांना लाकडी दंडुके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या खांद्याला आणि तोंडाला गंभीर मार लागला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’40e75696-cdd9-11e8-97a2-0b36d2242e9e’]

महसूल विभागाचे पथक लोहणर येथे वाळूसाठी गस्त घालण्यासाठी गिरणा नदीपात्राजवळ गेले होते. या पथकाने २ ट्रेक्टर पकडून त्यावर कारवाई करण्यासाठी मोबाईलने व्हिडिओ घेण्यास सुरुवात केली. यावेळी २० ते २५ जणांच्या घोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढवत फावड्याने लाथा बुक्क्यांने मारहाण केली आणि मोबाईल हिसकावून ते पळून गेले.
[amazon_link asins=’B07C8KJBRY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’47822a07-cdd9-11e8-a666-f55852aeb018′]

या हल्ल्यात तलाठी अंबादास पुरकर यांना लाकडी दंडुके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. पुरकर हे या हल्यात गंभीर जखमी झाले असून त्याच्या खांद्याला आणि तोंडाला गंभीर मार लागला आहे. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवळा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

You might also like