‘ती’ बोट स्फोटाने उडविली, मात्र जेसीबी सोडला ?

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – सांगवी दुमाला शिवारातील भीमा नदी पात्रात श्रीगोंदा पोलिसांनी विनापरवाना वाळूने भरलेल्या दोन ट्रक जप्त केली.  वाळूचा उपसा करणारी एक बोट जिलेटिनचा स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्यात आली. मात्र, एका बड्या वाळूतस्कराचा बेकायदा वाळू उपसा करणारा जेसीबी कारवाई न करता सोडून देण्यात आल्याची चर्चा आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई करून १४ लाख रूपये किंमतीची वाहने व वाळू जप्त केली. पोलीस काँस्टेबल अमोल अजबे यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यावरून अप्पा राठोड (रा. सोनवडी, ता. दौंड), ज्ञानदेव मदने (रा. सांगवी, ता. श्रीगोंदा) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आली आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांनी दोन ट्रक पकडून वाळूचा उपसा करणारी बोटचा स्फोट करून उडवून देण्यात आली. मात्र यातील एका बड्या वाळूतस्कराचा जेसीबा कारवाई न करता सोडून दिला. त्यामुळे श्रीगोंदा पोलीस संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग, समझोता एक्सप्रेस रद्द 

लोकसभा निवडणूक : माढ्यातून शरद पवारांच्या विरोधात राजू शेट्टी रिंगणात ? 

पकडलेले ‘ते’ 2 डंपर, 1 ट्रॅक्‍टर गायब ; प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर 

You might also like