पुणे ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकपदी संदीप पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल झाले असून शुक्रवारी रात्री राज्य गृह विभागाने राज्यातील तब्बल 95 उपायुक्‍त / अधिक्षक दर्जाच्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक म्हणून संदीप पाटील यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

संदीप पाटील हे सध्या सातारा येथे पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची पुणे ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B00RM1EC1S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ea0ce80-9212-11e8-a162-c9207e0fb1cc’]

पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षकांना पदोन्‍नती मिळाल्याने त्यांच्या रिक्‍त जागेवर संदीप पाटील यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. बदल्या झालेल्या 95 पोलिस अधिकार्‍यांमध्ये पुणे शहरातील देखील पोलिस उपायुक्‍तांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या रखडल्या होत्या. शुक्रवारी रात्री उशिरा राज्य गृह विभागाने पोलिस उपायुक्‍त, पोलिस अधिक्षक, पोलिस उप महानिरीक्षक आणि पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल झाल्याचे समोर आले आहे.