सांगलीत सावकारांची दहशत, पोलीस अधीक्षकांनी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन

सावकारांविरोधात आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच सावकारांविरोधात असलेल्या तक्रारीही देण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात सावकारांच्या जाचाकुळे अनेक गंभीर प्रकार घडले असून याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी एक विशेष अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे.
[amazon_link asins=’B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’554dbee9-af90-11e8-a48d-d3c65c78ec20′]

सांगली जिल्ह्यात सावकारांची दहशत वाढली असून या दहशतीच्या सावटाखाली अनेक कर्जदार वावरत आहेत. काही दिवसांपूर्वीच मिरजेत सावकाराच्या तगाद्याने एकजण बेपत्ता झाला आहे. इस्लामपूर येथे सावकाराने एकाचे घर बळकावले. सावकारांकडून वसूल केल्या जाणा‍ऱ्या पठाणी व्याजामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले असून अनेकजण सावकारांनी धमकावल्यामुळे भीतीपोटी अनेकजण बेपत्ता झाले आहेत.

जाहिरात

या गंभीर प्रकाराची दखल घेत अधीक्षक शर्मा यांनी आता सावकारांविरोधात अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे सावकारांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यातील सावकारांवर आता कडक कारवाई करण्याचा इशाराही अधीक्षक शर्मा यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात सावकारांविरोधात आलेल्या तक्रारींचा आढावा अधीक्षक शर्मा यांनी घेतला आहे. त्यांनी सावकारांवर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिले आहेत. यासाठी पन्नासहून अधिक सावकारांची यादी तयार करण्यात आली आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांनी सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याची घोषणा केली होती. त्यावेळी काही प्रमाणात सावकारांवर कारवाईही करण्यात आली होती. त्यानंतरही राज्यातील सावकारी काही प्रमाणात आटोक्यात आली असली तरी आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर या सावकारांनी पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र आहे.

जाहिरात