सांगली : न्यायालयाच्या परिसरातून युवकाचे अपहरण करुन मारहाण

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

न्यायालयाच्या कामकाजासाठी सांगलीत आलेल्या युवकाचे न्यायालयाच्या परिसरातून अपहरण करुन मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (दि.२७) रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास विजयनगर येथील न्यायालयासमोर घडली.

विजय हणमंत जाधव (वय ३८, रा. केबीपी कॉलेजजवळ, सातारा. मूळ रा. अथणी) असे अपहरण करुन मारहाण करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून त्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

[amazon_link asins=’B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d7dd4d15-7af9-11e8-b505-ad4741a6e4b4′]

जाधव हा न्यायालयीन कामकाजासाठी बुधवारी सांगलीत आला होता. दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास विजयनगर येथील न्यायालयासमोर एका मोटारीत बसलेल्या दोघांनी त्याला बोलावून घेतले. तुझे आमच्याकडे काम आहे, असे सांगून त्यांनी त्याला मारहाण करुन मोटारीत बसवले. मोटारीने ते विट्याला गेले. विट्यात गेल्यानंतर तेथे थांबलेल्या अन्य दोघांनीही जाधवला मारहाण केली. यामध्ये जाधव जखमी झाला. विट्यात मारहाण करुन त्यानंतर अपहरणकत्र्यांनी त्याला सोडून दिले. जखमी अवस्थेत जाधवने विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले. त्याने याबाबत फिर्याद दिली असून चौघा अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.