सांगली : ऑपरेशन ऑल आऊटमध्ये अडीचशे जणांवर कारवाई

सागंली : पोलीसनामा ऑनलाईन

महापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने “ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम राबविली. प्रलंबित समन्स, वॉरंट आदीची माहिती संकलित करुन 250 जणांवर कारवाईचा बडगा उगारला. सुमारे पन्नास हजारांचा दंडही वसुल केला.

अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला. जिल्ह्यातील रेकॉर्डवरील, फरारी आरोपींवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. काल झालेल्या कारवाईत एकूण 28 ठिकाणी ही नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात 41 पोलिस अधिकारी 307 कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

[amazon_link asins=’B0772W7PZ9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d6a1ee6b-7af6-11e8-bd1f-0d7f3bb21abc’]

गुन्ह्यातील संशयितांना न्यायालयात हजर राहण्याबाबत 69 समन्स न्यायालयाने बजावले आहेत. त्यावर एकाचवेळी कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली. तीघांना अटक करण्यात आली. 11 हॉटेल्स, तर फरारी 9 जणांना अटक करण्यात आली. तर 52 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्हची करवाई करण्यात आली.