Sangli Anti Corruption | आरोपी न करण्यासाठी 25 हजारांची लाच घेणारा सहायक पोलीस निरीक्षक ACB च्या जाळ्यात

सांगली : Sangli Anti Corruption | गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी २५ हजारांची लाच घेताना लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने (Sangli Anti Corruption) मिरज पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षकाला सापळा लावून रंगेहाथ पकडले. समाधान वसंत बिले API Samadhan Vasant Bile (वय ४२, रा. अधिकारी निवासस्थान, पंढरपूर रोड, मिरज) असे अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

समाधान बिले याची मिरज पोलीस ठाण्यात (Miraj Police Station) नियुक्ती होती. त्याच्याकडे तपासात असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांचे नातेवाईकांना आरोपी न करण्यासाठी बिले याने २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याचा तक्रार अर्ज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला २७  ऑगस्ट रोजी मिळाला होता. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २७  ऑगस्ट, १ सप्टेबर, ७ व ८ सप्टेंबर रोजी पडताळणी केली. त्यात बिले याने २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मिरज येथील हिरा हॉटेल चौक येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. तक्रारदाराकडून २५ हजार रुपये लाच स्वीकारताना बिले याला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज
गुरव (Addl SP Suraj Gurav), अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले,
पोलीस अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार, अजित पाटील, संजय संकपाळ, भास्कर भोरे, प्रितम चौगुले, धनंजय खाडे, राधिका माने, श्रीपती देशपांडे, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.

हे देखील वाचा

High Court | विवाहित असूनही इतर कुणासोबत सहमतीने संबंधात राहणे गुन्हा नाही – हाय कोर्ट

ट्रेनमध्ये प्रवास करताना काही त्रास झाला तर Rail Madad App द्वारे ताबडतोब करा तक्रार; जाणून घ्या

IRCTC नं गुंतवणुकदारांना 2 वर्षात केलं ‘मालामाल’, एक लाखाचे दिले 10 लाख रुपये; जाणून घ्या ‘कमाई’चा मार्ग

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Sangli Anti Corruption | acb arrest api samadhan vasant bile while taking bribe of 25 thousand in miraj police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update