सांगली : नाकाबंदीदरम्यान वाहनचालकांकडून दंड वसूल

सांगली  : पोलीसनामा ऑनलाईन

शहरातील मुख्य रस्त्यावर कुपवाड पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली असता 50 मोटारसायकल चालकावर कारवाई केली. तर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दहा चालक अशा साठ वाहन चालकाकडून तीस हजार रूपयांचा दंड वसूल केला.

[amazon_link asins=’B076Y4P7NQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’842c6cc5-8aa9-11e8-a196-8fcd7e543715′]
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात नाकाबंदी करण्याचे आदेश कुपवाड पोलिसांना दिले होते. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक विकास जाधव यांच्या उपस्थितीत शहरातील मुख्य रस्त्यावर बुधवारी सायंकाळी पोलिसांनी नाकाबंदी करून सर्व ये जा करणाऱ्या वाहनांची तपासणी केली. अचानक पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमुळे वाहनचालकात चांगलीच खळबळ माजली होती.

या नाकाबंदीत 50 मोटारसायकल धारकांच्यावर कारवाई करण्यात आली असून यावेळी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दहा वाहनचालकावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 60 वाहनचालकाकडून 30 हजार रूपये दंड वसूल केला असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.