Sangli News : शिराळा तालुक्यातील विवाहित तरूणीचा मृतदेह विहिरीत आढळल्यानं प्रचंड खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात देववाडी येथे धक्कादायक घटना घडली आहे. दैववादी येथील एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने एका विवाहित तरुणीची विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली. असे उघड झाले आहे. रुपाली खोत (वय, ३२) असे त्या विवाहित तरुणीचे नाव आहे. रुपाली हि बेपत्ता झाली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सकाळी विहिरीत आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून विवाहित तरुणी रुपालीला विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी ही विविहिता बेपत्ता झाली होती. आज, सकाळी या तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. तर निवास खोत असे संशयित आरोपीचे नाव असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तिला विहिरीत ढकलले, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.