सांगली : युवकाला रॉडने मारहाण करून लुटले, सहाजणांवर गुन्हा दाखल

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

शहरातील हनुमाननगर येथे भावासमवेत चालत जाणार्‍या एका युवकाला रॉडने बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील मोबाईल आणि दोन हजार तीनशे रूपयांची रोकड लुटण्यात आली. रविवारी (दि.५) सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये विनायक शंकर माळी (वय 23, रा. जुना धामणी रस्ता) जखमी झाला आहे. याप्रकरणी आकाश हाले, आकाश मोहिते, आक्रम, राक्या, इर्‍या, गोट्या (पूर्ण नावे नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’48a48e3f-9999-11e8-8929-9f61f0e7af8f’]

याप्रकरणी जखमी विनायक माळीने फिर्याद दिली आहे. विनायक रविवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास हनुमाननगर येथील नवव्या गल्लीतून चालत निघाला होता. त्यावेळी सर्व संशयित तेथे आले. त्यांनी अचानकपणे विनायकला शिवागाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्याचा भाऊ भांडण सोडवण्यास गेल्यानंतर त्यालाही मारहाण करण्यात आली. यावेळी विनायकला खाली पाडून लाथा-बुक्क्यांनीही बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर संशयितांनी त्याच्या खिशातील मोबाईल, दोन हजार तीनशे रूपयांची रोकड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड असा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला.

यामधये विनायक जखमी झाला आहे. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी त्याने रविवारी रात्री उशीरा विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहाजणांविरोधात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.