Sanjay Aggarwal | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या पुणे शहर प्रसिद्धीप्रमुखपदी संजय अगरवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संजय अगरवाल (Sanjay Aggarwal) यांची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या (Balasaheb’s Shivsena) पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख पदी (Pune City Publicity Chief) नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख अजय भोसले (Ajay Bhosale) आणि पुणे शहरप्रमुख, माजी नगरसेवक प्रमोद (नाना) भानगिरे (Pramod (Nana) Bhangire) यांनी संजय अगरवाल (Sanjay Aggarwal) यांची नियुक्ती केली आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Udaya Samant) यांच्या हस्ते अगरवाल (Sanjay Aggarwal) यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्ष वाढीच्या कार्यात अगरवाल जबाबदारीने पद सांभाळतील, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला.

पुणे शहराच्या राजकारण (Politics) आणि समाजकारणात (Social)संजय अगरवाल गेली तीस वर्षे कार्यरत आहेत. व्यापार, शिक्षणक्षेत्र यातील समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. गेली वीस वर्षे ते पत्रकारितेच्याही क्षेत्रात असून, संपादकपद भूषवीत आहेत. विविध प्रसार माध्यमांविषयी त्यांचा अभ्यास असून, जनसंपर्कही दांडगा आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि पक्ष यांचे कार्य, धोरणे सर्वसामान्यांपर्यंत
पोहोचविण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. नेत्यांच्या विश्वासास मी पात्र ठरेन, असे मनोगत संजय
अगरवाल यांनी व्यक्त केले.

Web Title :- Sanjay Aggarwal | Sanjay Agarwal as Pune City Publicity Chief of ‘Balasaheb’s Shiv Sena’ Party

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radhika Apte | अभिनेत्री राधिका आपटेचे मोठे वक्तव्य, म्हणाली – ‘बॉलिवूडमध्ये महिलांना…’

Kantara Movie | ‘कांतारा’ पाहून रजनीकांत यांच्या अंगावर आला काटा! चित्रपटासाठी लिहिली भावूक पोस्ट